LIVE UPDATES

५ षटके, ५ बळी, ० धावा...वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने कसोटीत रचला इतिहास

5 Wicket Maidens : ग्रीव्ह्सने केलेली ही कामगीरी कसोटी क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग पाच मेडन ओव्हर्समध्ये पाच बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 29, 2026 01:16 PM
views 823  views

Justin greaves five wicket maiden : कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच 'मेडन ओव्हर्स'मध्ये पाच बळी (विकेट्स) घेत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्ह्सने इतिहास रचला आहे. ग्रीव्ह्सने केलेली ही कामगीरी कसोटी क्रिकेटच्या १५० वर्षांच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग पाच मेडन ओव्हर्समध्ये पाच बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्रिनिदाद येथे सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, ग्रीव्ह्सने घातक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानी फलंदाजीची फळी कोलमडून टाकली. 

दरम्यान, यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर होता. स्टुअर्ट याने जानेवारी २०१६ मध्ये जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना सलग चार मेडन ओव्हर्समध्ये बळी घेतले होते. ग्रीव्ह्सने आता तो विक्रम मागे टाकला आहे. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३११ धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तान संघ फलंदाजी साठी उतरला तेव्हा एका टप्प्यावर पाकिस्तानची स्थिती मजबूत वाटत होती. संघाची धावसंख्या ३ बाद २४४ अशी होती त्यावेळी जस्टिन ग्रीव्ह्स गोलंदाजीसाठी आला. कर्णधार शान मसूदने आपले शतक पूर्ण केले होते. मात्र, मसूदचा बळी घेत ग्रीव्ह्सने पाकिस्तानचा डाव खिळखिळा केला. दुपारच्या जेवणापर्यंत पाकिस्तानची धावसंख्या ८ बाद २६७ अशी झाली होती.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Asian Games Hockey India Thrash Indonesia 13-1 in Opening Match
India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
India Women enter Asia Cup 2026 final
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026