LIVE UPDATES

मुक्ताई ॲकेडमीची राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 16, 2026 09:03 PM
views 187  views

सावंतवाडी :  सांगली येथील नुतन बुदधिबळ मंडळातर्फे अठराव्या कै.बाबूकाका शिरगावकर फिडे रॅपिड रेटिंग राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत भारतातील महाराष्ट्रासहित सात राज्यातील दोनशे साठ खेळाडूंनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या दिव्यांका नार्वेकर, आकाश वाटवे, प्रज्वल नार्वेकर, पुष्कर केळूसकर, चिदानंद रेडकर, हर्ष राऊळ आणि बाळकृष्ण पेडणेकर या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळ केला.             

 मुक्ताई ॲकेडमीची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू सहा वर्षाची दिव्यांका नार्वेकर हिने दुस-यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन दोन पारितोषिके पटकावली. दिव्यांकाने नऊ राऊंड्सपैकी दोन राऊंड्स जिंकून आठ वर्षाखालील मुलींच्या गटात चौथा क्रमांक मिळवला. तीला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच दिव्यांकाला "बेस्ट परफॉर्मर यंगेस्ट गर्ल"साठी आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. दिव्यांका राष्ट्रीय स्पर्धेत दोन पारितोषिके मिळवणारी पहीली खेळाडू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू हर्ष राऊळ याने पाच राऊंड्स जिंकून चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक मिळवला. त्याला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने पाच राऊंड्स जिंकून आणि दोन राऊंड्स बरोबरीत सोडवून रेटिंग कॅटेगरीत सहावा क्रमांक मिळवला. त्याला रोख पारितोषिक आणि आकर्षक मेडल देऊन गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे गेली दहा वर्षे सातत्याने मुलांना प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्यासाठी प्रोत्साहित करुन अनेक पारितोषिके मिळवणा-या मुक्ताई ॲकेडमीला "बेस्ट ॲकेडमी" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलांनी यश संपादन केले आहे. सर्व स्तरातुन विदयार्थ्यांचे आणि मुक्ताई ॲकेडमीचे कौतुक करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Asian Games Hockey India Thrash Indonesia 13-1 in Opening Match
India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
India Women enter Asia Cup 2026 final
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026