LIVE UPDATES

सिंधुदुर्ग बँकेच्या लिपिक पदाच्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती 17 एप्रिलला

परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 13, 2026 22:37 PM
views 1673  views

परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध                                                                 

 सिंधुदुर्गनगरी :  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त झाला आहे. सदर यादी बँकेच्या वेबसाईटवर https.sindhudurgdcc.bank.in/ पाहण्याकररीता उपलब्ध आहे.               

यापैकी बँक धोरणानुसार एकूण गुणांपैकी ५०% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची१:३ या प्रमाणात एकूण २३४ उमेदवार मुलाखतीकरिता पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.१७/०४/२०२६ पासून बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात येणार आहेत.                               

सदर मुलाखतीसाठीचे कॉल लेटर (मुलाखत पत्र)संबंधित उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेलवर आयडीवर पाठवण्यात येणार आहे.त्यामुळे संबंधित उमेदवारानी आपला ईमेल आयडी नियमितपणे  तपासावा असे आव्हान बँकेतर्फे करण्यात येत आहे. मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व छायांकीत प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.अशी माहीती बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026