LIVE UPDATES

मत्स्यव्यवसाय विभागात २५४ जागांसाठी भरती

मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार : एमपीएससीमार्फत राबविण्यात येणार भरतीप्रक्रिया
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 23, 2026 17:23 PM
views 547  views

सिंधुदुर्ग :  महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य विभागात २५४ सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क पदांची भरती केली जाणार आहे. ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राबविण्यात येणार आहे.  या पदभरतीमुळे राज्यातील 254 मत्स्यविज्ञान पदवीधरांना शासकीय सेवेत प्रवेश करता येणार आहे. तसेच या निर्णयामुळे राज्याचा मत्स्यव्यवसाय विभाग अधिक सक्षम करण्यासाठी मदत होणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. 

 मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य विभागातील भरतीच्या निर्णयामुळे राज्यात युवकांना रोजगाराज्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर मत्स्य विभागाचे कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकार तसेच लोकाभिमुख होणार असून मत्स्यव्यवसायाशी संबधितांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी मदत होणार आहे. 

मत्स्य विभागाच्या इतिहासात प्रथमच नवीन आकृतीबंधाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने विभागाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होणार आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजना, मत्स्य संवर्धन, किनारपट्टी भागातील विकासकामे आणि मत्स्यव्यवसायिकांना तांत्रिक मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) गट-क पदाकरीता एकूण २५४ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवाराकडे मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना 5 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026