LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील युवक, युवतींनी स्वयंसेवक पदासाठी अर्ज करावे

जिल्हा युवा अधिकाऱ्यांचे आवाहन : ५ ऑगस्ट अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 18:40 PM
views 259  views

सिंधुदुर्गनगरी : भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयतर्फे स्वयंसेवक या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाच्या भरतीसाठी जिल्ह्यातील युवक वा युवतींना www.nyks.nic.in या वेबसाईटवर ५ ऑगस्ट, २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे. या पदासाठी शिक्षण कमीत कमी १० वी पास व वयोमर्यादा दि. १ एप्रिल, २०२५ रोजी १८ पेक्षा जास्त व 29 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी कामगार असू नये. स्वयंसेवक मानधन दर महा 5 हजार रुपये आहे. स्वयंसेवक हा त्याच तालुक्यातील रहिवासी असावा. पगाराची नोकरी नाही किंवा स्वयंसेवक कायदेशीररीत्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल. अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ५ ऑगस्ट, २०२६ असेल. अधिक माहितीसाठी मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी १० ते सायं ५) मोबाईल नं. ९४२१२६७०११ संपर्क साधावा.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026