LIVE UPDATES

new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max : बुधवारी ॲपलकडून दोन आयफोनचे नवे मॉडेल्स लॉन्च करण्यात आले. यामधील आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये ॲपलची अत्याधुनिक ए 20 प्रो चिपसेट आणि कंपनीचे नवीन इन-हाऊस सी 2 मोडेम वापरण्यात आले आहे. यामध्ये आयओएस 27, नवीन 'ॲपल इंटेलिजन्स' फिचर्स आणि नवीन 'सिरी एआय' यांचा समावेश आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 10, 2026 13:43 PM
views 451  views
iPhone 18 Pro and iPhone 18 Pro Max

नवी दिल्ली : ॲपलने आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स लॉन्च केले आहेत. ॲपलतर्फे  'सरप्राईज अँड शाइन' कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी हे दोन मॉडेल लॉन्च करण्यात आले. मागील आयफोन मॉडेल्सच्या तुलनेत या आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. हे दोन्ही नवीन मॉडेल्स डीप ब्लॅक, सिल्व्हर, ग्लेशियर आणि बरगंडी अशा चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहेत.

बुधवारी ॲपलकडून दोन आयफोनचे नवे मॉडेल्स लॉन्च करण्यात आले. यामधील आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये ॲपलची अत्याधुनिक ए 20 प्रो चिपसेट आणि कंपनीचे नवीन इन-हाऊस सी 2 मोडेम वापरण्यात आले आहे. यामध्ये आयओएस 27, नवीन 'ॲपल इंटेलिजन्स' फिचर्स आणि नवीन 'सिरी एआय' यांचा समावेश आहे. 

आयफोन 18 प्रो मॉडेलमध्ये ६.३ इंचाचा डिस्प्ले आहे. तरआयफोन 18 प्रो मॅक्समध्ये ६.९इंचाचा मोठा डिस्प्ले आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 'सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी स्क्रीन आहेत. ज्यामध्ये 'प्रो-मोशन' टेक्नलॉजी आणि 'ऑलवेज-ऑन' मोडची सुविधा आहे. दोन्ही फोन्समध्ये ॲल्युमिनियम युनिबॉडी डिझाइन आहे आणि मागील मॉडेल्सप्रमाणेच 'ॲक्शन बटण' व 'कॅमेरा कंट्रोल'चा समावेश आहे. 

आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सची कॅमेरा (iPhone 18 Pro and Pro Camera)

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये व्हेरिएबल ॲपर्चरसह ४८ मेगापिक्सेलचा 'फ्युजन' प्रायमरी सेन्सरचा समावेश आहे. कॅमेरा युनिटमध्ये ४८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड शूटर आणि ४८ मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरामध्ये ऑटोफोकस आणि 'सेंटर स्टेज' सपोर्टसह १८ मेगापिक्सेलचा सेन्सर कॅमेरा आहे. 

नवीन सेन्सर कमी प्रकाशातील फोटोग्राफी सुधारण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. कॅमेरा ॲपमध्ये 'प्रो कंट्रोल्स'चा समावेश आहे. यात 'फोटोग्राफिक स्टाइल्स' देखील मिळतात. दोन्ही उपकरणांमध्ये 'ॲपल रेफरन्स इमेज' ही सुविधा देण्यात आली आहे. हीट कंट्रोल करण्यासाठी आयफोन १८ प्रो सिरीजमध्ये 'व्हेपर चेंबर' बसवण्यात आले आहे. यात कंपनीचा स्वतःचा नवीन सी 2 मोडेम देण्यात आला आहे. 

आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सची बॅटर (iPhone 18 Pro and Pro Max Battery)

आयफोन 18 प्रो एकदा चार्ज केल्यावर २४ तासांपर्यंत बॅटरी लाईफ देतो, तर प्रो मॅक्स मॉडेल ३० तासांपर्यंत चालू शकते असा दावा ॲपलकडून केला जात आहे. तसेच याची बॅटरी अवघ्या १५ मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते. आयफोन १८ प्रो एका चार्जवर ३६ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देतो, तर प्रो मॅक्स मॉडेल केवळ ई-सिम प्रकारामध्ये ४५ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देऊ शकते. 

प्रो मॉडेलची बॅटरी एका चार्जवर २४ तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते, तर प्रो मॅक्स मॉडेल ३० तासांपर्यंत चालू शकते. ॲपलच्या मते, आयफोन १८ प्रो वायर्ड कनेक्शनद्वारे सुमारे १५ मिनिटांत किंवा वायरलेस पद्धतीने सुमारे ३० मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो. आयफोन १८ प्रो मॅक्स केवळ पाच मिनिटांच्या वायर्ड चार्जिंगवर तो सुमारे सात तास व्हिडिओ प्लेबॅक देतो आणि पूर्ण चार्जवर ३० तासांपर्यंत प्लेबॅक देऊ शकतो असा दावा केला जात आहे.

आयफोन 18 प्रो आणि प्रो मॅक्सची किंमत (iPhone 18 Pro and Pro Max Price)

भारतात, आयफोन 18 प्रो २५६ जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत १,६४,९०० रुपये तर 512 जीबी स्टोरेजची किंमत १,८९,९०० रुपये, 1 टीबी मॉडेलची किंमत २,३९,९०० रुपये, 2 टीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३,१४,९०० रुपये आहे.

आयफोन 18 प्रो मॅक्सच्या २५६ जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत १,७९,९०० इतकी आहे. तर 512 जीबी स्टोरेजची किंमत २,०४,९०० रुपये, 1 टीबी मॉडेलची किंमत २,५४,९०० रुपये, 2 टीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ३,२९,९०० रुपये आहे. नवीन फोन्ससाठी प्री-ऑर्डर १२ सप्टेंबरपासून सुरू होतील आणि विक्री १८ सप्टेंबरपासून सुरू होईल.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
Royal Enfield Himalayan 440 : रॉयल एनफिल्डची 'हिमालयन ४४०' लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
September 08, 2026