LIVE UPDATES

OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन

OPPO K14 Lite launch in India : भारतात ओप्पो के 14 5जीची सुरुवातीची किंमत १७,९९९ रुपये होती, त्यामुळे आता ओप्पो के 14 कोणत्या किंमतीत भारतात लॉन्च होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 11, 2026 17:56 PM
views 712  views

नवी दिल्ली : ओप्पो भारतात लवकरच के सिरीजमधील नवीन फोन ओप्पो के 14 लाईट (OPPO K14 Lite) लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दीर्घकाळ चालणारी बॅटरी, दमदार परफॉर्मन्स अन् उत्तम डिझाईनला प्राधान्य देण्यात आले आहे. हा एक बजेट 4 जी स्मार्टफोन असू शकतो.

भारतात ओप्पो के 14 5जीची सुरुवातीची किंमत १७,९९९ रुपये होती, त्यामुळे आता ओप्पो के 14 कोणत्या किंमतीत भारतात लॉन्च होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ओप्पो के 14 लाईट हा स्मार्टफोन १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता लॉन्च केला जाईल.

ओप्पो के 14 लाईट मध्ये डिस्प्ले हा १२० हर्टझचा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ७,००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग देण्यात आले. स्मार्ट आणि स्मूथ, एआय सक्षम कलर ओएस 16 देण्यात आली आहे.

नवीन रिपोर्ट्सनुसार, ओप्पो के 14 लाईट हा एक बजेट 4 जी स्मार्टफोन असू शकतो. CPH3007 हा मॉडेल क्रमांक असलेला हा डिव्हाइस बीआयएस आणि गुगल प्ले कन्सोल सारख्या प्लॅटफॉर्मवरील लिस्टिंगमध्ये दिसून आला आहे. काही रिपोर्ट्समध्ये ७,००० एमएएच बॅटरीचा उल्लेखही करण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीच्या टीझरमध्येही याची माहिती मिळाली आहे. १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या लॉन्चदरम्यान कंपनी ओप्पो के 14 लाईटची किंमत, प्रोसेसर, कॅमेरा, डिस्प्ले, रॅम-स्टोरेजचे प्रकार आणि विक्रीविषयक माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026
Royal Enfield Himalayan 440 : रॉयल एनफिल्डची 'हिमालयन ४४०' लॉन्च, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स
September 08, 2026