LIVE UPDATES

कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस

तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कुणकेश्वर हायस्कूल अव्वल ; वाडा हायस्कूल द्वितीय
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 17:32 PM
views 146  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर, ता. देवगड येथे तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. विविध शाळांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंनी कुस्तीच्या आखाड्यात उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. या शासकीय स्पर्धेत कुणकेश्वर हायस्कूलने अव्वल स्थान पटकावले, तर वाडा हायस्कूलने द्वितीय स्थान मिळविले.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थाध्यक्ष चंद्रकांत घाडी, संस्था उपाध्यक्ष तुकाराम तेली, खजिनदार रावजी वाळके, संचालिका शुभांगी तेली, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, पाटथर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती झुरे, देवगड महाविद्यालयाचे प्रा. गोपणे, कुस्ती पंचप्रमुख अभिजीत शेट्ये, क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे, शेठ, सोमनाथ माने, महाले, लाड, मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थाध्यक्ष चंद्रकांत घाडी यांनी विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन केले. सरपंच महेश ताम्हणकर यांनी कुस्ती या पारंपरिक खेळाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक विकास साधावा, असे सांगितले. संस्था उपाध्यक्ष तुकाराम तेली यांनी क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. देवगड तालुका क्रीडा समन्वयक आकाश पारकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात ३५ किलोखालील गटात मंजुष रुपेश घाडी (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, करण सुरेश कदम (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय, तर कौस्तुभ चंद्रशेखर जोईल (जि. प. शाळा कसबा वाघोटन) तृतीय ठरला. ३८ किलोखालील गटात श्रेयश समीर परकर (वाडा हायस्कूल) प्रथम, श्लोक हेमंत धुवाळी (मुणगे हायस्कूल) द्वितीय, तर निहार नरेंद्र ठुकरुल (कुणकेश्वर हायस्कूल) तृतीय आला. 

४१ किलोखालील गटात सार्थक दीपक घाडी (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, हर्ष अमोल गुरव (जि. प. शाळा कसबा वाघोटन) द्वितीय, तर रितेश दीपक शिरसेकर (वाडा हायस्कूल) तृतीय आला. ४४ किलोखालील गटात आयुष संदीप पुरळकर (वाडा हायस्कूल) प्रथम, तर देवर्ष अनिल मुळम (वाडा हायस्कूल) द्वितीय ठरला. ४८ किलोखालील गटात रिषभ योगेश धुवाळी (मुणगे हायस्कूल) प्रथम, अनमोल मिलिंद जोशी (जि. प. शाळा कसबा वाघोटन) द्वितीय, तर आरव संजय कदम (कुणकेश्वर हायस्कूल) तृतीय आला.

१४ वर्षांखालील मुलींच्या गटात ३० किलोखालील गटात आरोही प्रवीण गोळम (जि. प. शाळा कसबा वाघोटन) प्रथम, आर्या महेश आईर (जि. प. शाळा कातवण) द्वितीय ठरली. ३३ किलोखालील गटात माणसी निलेश आंबेरकर (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, निधी नितेश भडेकर (वाडा हायस्कूल) द्वितीय, तर मृणाली अजित कदम (जि. प. शाळा पाटथर) तृतीय आली. ३६ किलोखालील गटात संजना बापू सावंत (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, निधी दिनेश तेली (जि. प. शाळा कसबा वाघोटन) द्वितीय, तर आरोही संदेश कांबळे (वाडा हायस्कूल) तृतीय आली. 

३९ किलोखालील गटात गार्गी निलेश वाडेकर (वाडा हायस्कूल) प्रथम, पूर्वा महेश जोईल (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय आली. ४२ किलोखालील गटात ओवी महेश पुजारे (जि. प. शाळा कसबा वाघोटन) प्रथम, आर्या मिलिंद वाडेकर (वाडा हायस्कूल) द्वितीय, तर मिताली तुकाराम दळवी (कुणकेश्वर हायस्कूल) तृतीय आली. 

४६ किलोखालील गटात अन्वी राजन कोळसूमकर व शुभ्रा श्रीकांत गुरव (दोघीही जि. प. शाळा कसबा वाघोटन) अनुक्रमे प्रथम व द्वितीय, तर आर्या सचिन कांबळे (मुणगे हायस्कूल) तृतीय आली. ५० किलोखालील गटात सई संतोष जाधव (वाडा हायस्कूल) प्रथम, आराध्या जितेंद्र जाधव (वाडा हायस्कूल) द्वितीय आली. ५९ किलोखालील गटात रिदीमा गोविंद घाडी (मुणगे हायस्कूल) प्रथम आली.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटात ४५ किलोखालील गटात मेघेश आनंद वळंजू (मुणगे हायस्कूल) प्रथम, नीरज शंकर पुजारी (वाडा हायस्कूल) द्वितीय, तर जनार्दन लक्ष्मण पटकारे (मुलगी हायस्कूल) तृतीय आला. ४८ किलोखालील गटात सोहम संजय साहेब (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, जय रवींद्र सावंत (मुणगे हायस्कूल) द्वितीय, तर हर्ष योगेश गावकर (वाडा हायस्कूल) तृतीय आला. 

५१ किलोखालील गटात सर्वेश सुहास नानेरकर (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, तर मंथन संजय चव्हाण (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय आला. ५५ किलोखालील गटात गणेश नारायण परब प्रथम, सर्वेश दिनेश आईर द्वितीय (दोघेही कुणकेश्वर हायस्कूल) ठरले. ६० किलोखालील गटात सर्वेश रामदास तेली (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम आला. ६५ किलोखालील गटात विरेन सचिन गावकर (वाडा हायस्कूल) प्रथम, तर शिवम राजेंद्र गावकर (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय आला. ७१ किलोखालील गटात कृष्ण अरुण कदम (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, तर जय पुरुषोत्तम सावंत (मुणगे हायस्कूल) द्वितीय आला.

१७ वर्षांखालील मुलांच्या ग्रीको रोमन कुस्तीमध्ये ४५ किलोखालील गटात जयेश शरद चव्हाण, ५१ किलोखालील गटात यश शिवप्रसाद घाडी, ५५ किलोखालील गटात अमर अनिल फाटक आणि ८० किलोखालील गटात चंदन तुळशीदास चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. हे सर्व खेळाडू कुणकेश्वर हायस्कूलचे आहेत.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटात ४० किलोखालील गटात सृष्टी गणेश लब्दे (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, तनया अमोल जोशी (वाडा हायस्कूल) द्वितीय आली. ४३ किलोखालील गटात श्रावणी शशिकांत वाडेकर (वाडा हायस्कूल) प्रथम, वैदेही हेमंत वातकर (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय, तर गायत्री राजेंद्र धुवाळी (कुणकेश्वर हायस्कूल) तृतीय आली. ४६ किलोखालील गटात निधी कमलेश मोंडे (वाडा हायस्कूल) प्रथम आली. 

४९ किलोखालील गटात आर्या विक्रांत जोईल (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, तर गार्गी गणेश बाईत (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय आली. ४३ किलोखालील गटातील पुढील सामन्यात कुंजल दिनेश गावकर (वाडा हायस्कूल) प्रथम, तर श्रेया प्रसाद चव्हाण (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय आली. ५७ किलोखालील गटात सुहानी महेश लब्दे (कुणकेश्वर हायस्कूल) प्रथम, पूजा रवींद्र घाडी (कुणकेश्वर हायस्कूल) द्वितीय आली. ६१ किलोखालील गटात सृष्टी विश्वास मुंबरकर, ६५ किलोखालील गटात सुरक्षा योगेश शिंदे आणि ७३ किलोखालील गटात मृण्मयी संतोष धुरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. हे तिन्ही खेळाडू कुणकेश्वर हायस्कूलचे आहेत.

१९ वर्षांखालील मुलांच्या गटात ५७ किलोखालील गटात प्रथमेश प्रमोद ठोकून (देवगड कॉलेज) प्रथम, दर्शन निलेश वाडेकर (देवगड कॉलेज) द्वितीय आला. ६१ किलोखालील गटात रियान निसार राऊत, ६५ किलोखालील गटात अथर्व दयानंद पटवर्धन, ७० किलोखालील गटात ओम निळकंठ गावकर, ७४ किलोखालील गटात मंथन मंगेश गावकर आणि ८६ किलोखालील गटात निशांत अजित रासम यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

१९ वर्षांखालील ग्रीको रोमन कुस्तीमध्ये ५५ किलोखालील गटात कार्तिक मंगेश आचरेकर, ६७ किलोखालील गटात सर्वेश अमोल घाडी, ७२ किलोखालील गटात कुणाल भास्कर पेडणेकर आणि ८२ किलोखालील गटात समर्थ श्रीकांत पाळेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. हे सर्व देवगड कॉलेजचे खेळाडू आहेत.

१९ वर्षांखालील मुलींच्या गटात ५० किलोखालील गटात पूर्वा प्रमोद घाडी प्रथम व श्रावणी महेश पुजारे द्वितीय, तर त्याच ५० किलोखालील गटातील दुसऱ्या सामन्यात श्रावणी मंगेश गुळेकर प्रथम आली. ५५ किलोखालील गटात रिया उमेश नाणेरकर, ६५ किलोखालील गटात अंजली अर्जुन महाडिक आणि ७६ किलोखालील गटात रिया विनायक कावले यांनी प्रथम क्रमांक मिळवला. हे सर्व देवगड कॉलेजचे खेळाडू आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे, शिक्षकवृंद व सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. पंच म्हणून कासार्डेचे अभिजीत शेट्ये, कुणकेश्वर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे, देवगड कॉलेजचे गोपने सर, मुणगे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक महाले सर, जि. प. शाळा कुणकेश्वर-कातवणचे सोमनाथ माने, कसबा वाघोटन शाळेचे मोहिते सर, झुरे मॅडम आदींनी काम पाहिले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026
IND vs AFG T20I series : अफगाणिस्तान मालिकेसोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेतून हर्षित राणा 'बाहेर', त्याच्या जागी खेळणार विदर्भातील 'हा' खेळाडू
September 10, 2026