LIVE UPDATES

India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना

IND vs AFG T20I series : भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे मालिकेत अफगाणिस्तान बरोबरी साधण्याचा आणि मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 15, 2026 14:40 PM
views 176  views

नवी दिल्ली : भारत विरुध्द अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा सामना मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. तीन सामन्यांची टी 20 मालिका रविवारी १३ सप्टेंबर रोजी सुरू झाली. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे मालिकेत अफगाणिस्तान बरोबरी साधण्याचा आणि मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर दोन्ही संघांचे कर्णधार श्रेयस अय्यर आणि इब्राहिम झद्रान सायंकाळी ७ वाजता टॉससाठी मैदानात उतरतील.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क' वर पाहू शकता. भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 सामन्याचे लाईव्ह 'सोनीलिव्ह' ॲप किंवा वेबसाइटवर उपलब्ध नसेल. तुम्हाला लाईव्ह सामना पहायचा असल्यास 'फॅनकोड' ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, टिळक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती

अफगाणिस्तानचा संघ

इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), नूर रहमान (यष्टिरक्षक), अब्दुल्ला अहमदझाई, नवीन-उल-हक, सेदिकुल्ला अटल, दरविश रसुली, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026
IND vs AFG T20I series : अफगाणिस्तान मालिकेसोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेतून हर्षित राणा 'बाहेर', त्याच्या जागी खेळणार विदर्भातील 'हा' खेळाडू
September 10, 2026