LIVE UPDATES

Vidyanand Bapat : कर्णकर्कश डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 06:44 PM
views 376  views
Attack on Vidyanand Bapat pune

पुणे : गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांच्यावर येथील टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात हल्ला करण्यात आला. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना चार-पाच तरुणांनी बापट यांना अडवून वाद घातला. त्यानंतर या तरुणांनी त्यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातील एकाची ओळख पटली असून, संतोष चव्हाण असे त्याचे नाव आहे.

हल्लेखोर स्थानिक गणेश मंडळांशी संबंधित असल्याचे समजते. या घटनेमुळे पुणे शहरात संतापाची लाट पसरली असून राजकीय नेत्यांकडूनही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे. विवेकी भूमिका मांडणाऱ्या नागरिकांना संरक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबतची मागणी त्यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केली आहे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Ganeshotsav 2026 Nitesh Rane Flags Off Modi Express From Dadar
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026