LIVE UPDATES

CSMT Sawantwadi Express : चाकरमान्यांसाठी दररोज धावणार 'सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेस', असे आहेत तिकीटांचे 'दर'

CSMT Sawantwadi Express September 10 : या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही नियमित सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 09, 2026 04:59 PM
views 501  views
CSMT Sawantwadi Road daily express train starting September 10

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेसला गुरुवारी सीएसएमटी स्थानकावरुन मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यामुळे कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दरम्यान, सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. या गाडीच्या तिकीटांच्या आरक्षणासही सुरुवात झाली आहे.

या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही नियमित सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 

नवीन दैनिक एक्स्प्रेसच्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान दैनिक एक्सप्रेस गाडी क्रमांक १५०८७ आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दरम्यान दररोज धावणार आहे. 

गाडी क्रमांक १५०८७ सीएसएमटी–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस दररोज सीएसएमटी येथून रात्री ११.५५ वाजता सुटेल व ती दुपारी १.५० वाजता पोहोचेल. परतीची गाडी १५०८८ सावंतवाडी रोड –सीएसएमटी एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकावरुन सायंकाळी ५ वाजता सुटून पहाटे ६.४० वाजता पोहचेल.

'या' स्थानकांवर थांबा

या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. 

असे आहेत 'तिकीट दर'

या एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीसह शयनयान आणि सामान्य श्रेणीचे डबे उपलब्ध असतील. तिकीट आरक्षणाच्या संकेतस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शयनयान श्रेणीचे तिकीट दर ३८५ रुपये, तृतीय श्रेणी वातानुकूलित इकॉनॉमीचे तिकीट दर ९४० रुपये, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे तिकीट दर १,०२० रुपये, वातानुकूलित द्वितीय श्रेणीचे तिकीट दर १,४४० रुपये, वातानुकूलित प्रथम श्रेणीचे तिकीट दर २,३९० रुपये असणार आहे.



ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Ganeshotsav 2026 Nitesh Rane Flags Off Modi Express From Dadar
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026