LIVE UPDATES

CSMT Sawantwadi Express : सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान 'नियमित एक्सप्रेस'ला आजपासून सुरुवात

मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ : कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला मिळणार चालना
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 02:39 PM
views 9034  views
Mumbai CSMT–Sawantwadi Road Daily Express inaugural service will be flagged off

मुंबई : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेसला आजपासून सुरुवात झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे या रेल्वेसेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

या शुभारंभप्रसंगी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. 

या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही नियमित सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कोकणवासियांची ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

'या' स्थानकांवर थांबा

या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबे देण्यात आले आहेत. ही विशेष गाडी सीएसएमटी वरून दुपारी १२:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २  वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

मुंबई–कोकण प्रवासासाठी नियमित रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक, पर्यटक तसेच कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून, या सेवेमुळे कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Ganeshotsav 2026 Nitesh Rane Flags Off Modi Express From Dadar
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026