LIVE UPDATES

इंडोनेशियात फुटबॉल सामन्यावेळी चाहत्यांचा ‘राडा’

हिंसाचारात १७४ जणांचा मृत्यू
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 03, 2022 12:13 PM
views 586  views


ब्युरो न्यूज : इंडोनेशियातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. फुटबॉल सामन्यादरम्यान हिंसाचार घडला आहे. या हिंसाचारात १७४ जणांचा मृत्यू झाला असून, १८० च्यावरती लोक गंभीर जखमी झाले आहेत. इंडोनेशियाातील पूर्व जावा भागात ही घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यादरम्यान सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघाने अरेमा एफसीवर मात करत ३-२ ने सामना जिंकला. या सामन्यानंतर पराभूत झालेल्या अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घातला. यावेळी नाराज चाहत्यांना हुसकवण्यासाठी पोलिसांनी आश्रू धुराच्या कांड्याचा मारा केला.

त्यामुळे मैदानातील चाहत्यांमध्ये धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या. या दुर्घटनेत १७४ जणांच्या मृत्यू झाला. तर, अनेक गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर इंडोनेशिया बीआरआई लीगचे सर्व सामने एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026