LIVE UPDATES

अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित

सर्वोच्च न्यायालयाने NBE ला दिली परवानगी
Edited by:
Published on: June 06, 2025 15:34 PM
views 1830  views

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने केलेली विनंती मान्य केली असून, पीजी नीट परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा १५ जून रोजी होणार होती, पण परीक्षा मंडळाने परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती ए.जी. मसीह यांच्या खंठपीठाने हा निर्णय दिला. परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी दिलेल्या उत्तराबद्दल आम्ही समाधानी आहेत, असे न्यायालयाने आदेश देताना सांगितले. ३० मे रोजी दिलेल्या आदेशानुसार परीक्षा घेण्यासाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. ३ ऑगस्ट २०२५ रोजी परीक्षा घेण्यासाठी एनबीईला परवानगी देत आहोत. यापुढे वेळ वाढून दिला जाणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. 

याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घेण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. तुम्हाला दोन महिने वेळ का हवाय, असा प्रश्नही न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाला केला होता. 

राष्ट्रीय परीक्षा मंडळाने न्यायालयाला काय सांगितले..?

एनबीईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, जवळपास २.५ लाख विद्यार्थी आणि ४५० परीक्षा केंद्र आहेत. जर परीक्षा एकाच सत्रात घ्यायची असेल, तर ५०० केंद्राची गरज आहे. त्यामुळे केंद्रांची निवड करणे, सुरक्षेची व्यवस्था करणे आणि विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करण्यासंदर्भात वेळ लागणार आहे, असे एनबीईने कोर्टात सांगितले होते.        

न्यायमूर्ती पी.के मिश्रा यांनी मंडळाला तुम्हाला ३ ऑगस्ट पर्यंत वेळ हवा आहे. पण, तुम्हाला इतका वेळ का हवा आहे? असा प्रश्न विचारला होता. ए.जी. मसीह म्हणाले की, ३० मे रोजी न्यायालयाने आदेश देऊनही तुम्ही अजून प्रक्रिया सुरू केलेली नाही. मग तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे? विलंब होण्यास हेही कारण आहे. तुम्हाला दोन महिन्यांचा वेळ का हवाय?  त्यावर एनबीईने तांत्रिक कारणे आणि केंद्राची निवड करण्याचा मुद्दा अधोरेखित केला आणि ३ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येईल, असे सांगितले. कोर्टाने त्याला परवानगी दिली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026