मुंबई :- आज सकाळी सोन्याच्या भावात वादळी वाढ झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आज सोन्याचा दर गेला असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारणांमुळे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचे परिणाम सकाळपासूनच आशिया पॅसिफिक बाजारात झाले आहे.'गुड रिटर्न्स 'संकेतस्थळावरील माहितीनुसार सोन्याच्या २४ कॅरेट दरात प्रति ग्रॅम दर तब्बल ८१ रूपयांनी वाढला असून प्रति तोळा किंमत ९८४०० रूपयांवर पोहोचली आहे.तर २२ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७५ रूपयांनी वाढून ९०२० रूपयांवर पोहोचली आहे.तर प्रति तोळा किंमत ९०२०० रूपयांवर पोहोचली आहे.
१८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ६१ रूपयांनी वाढली असून ती ७३८० रूपयावर पोहोचली आहे तर १० ग्रॅम म्हणजेच एक तोळा किंमत ७३८०० रूपयावर पोहोचली आहे.देशातील मुंबई,पुणे,दिल्ली, कलकत्ता,बंगलोर अशा अनेक बहुतांश शहरातील सराफ बाजारात २४ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ९८४० ते ९८५५ रूपये आहे.
सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात मोठे चढउतार आले होते. सलग चार दिवस वाढ झाल्यानंतर दोन दिवस बाजारात घसरण झाली आज पुन्हा सराफा बाजारात सोने रिबांऊड (Rebound)झाले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेला दबाव पाहता यांचे पडसाद आशियाई शेअर बाजारात पहायला मिळत आहेत .नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली अतिरिक्त टेरिफ शुल्कवाढ ही त्यांच्या अधिकाराचे केलेले उल्लंघन असल्याचा ठपका त्यांच्यावर कनिष्ठ न्यायालयाने केला होता.त्याला सरकारने अपील दाखल केल्यानंतर अमेरिकन अपील न्यायालयाने टेरिफवरील शुल्कवाढ थांबवण्याची प्रकिया बंद करुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने निकाल दिला परिणामी टेरिफचा मार्ग आता मोकळा झाला आहे.तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यापूर्वी अमेरिकेत येणार असलेल्या रोजगार डेटाची वाट गुंतवणूकदार पाहत आहेत.
परिणामी सोन्याच्या गुंतवणूकीत पर्यायी वाढ झाल्याने मागणीतही वाढ झाली .परिणामी बाजारात वाढ झाली आहे. सकाळी युएस गोल्ड फ्युचर (Gold Future) मध्ये ०.५९% टक्के वाढ झाली होती. तर एमसीएक्स (MCX) वर सोन्याचा निर्देशांकात ०.३२% वाढ झाल्याने किंमत पातळी ९७१२० रूपयावर पोहोचली आहे.
चांदीचे भाव कालप्रणाणेच आहेत.अजूनपर्यंत त्यात कुठलाही बदल झालेला नाही.परवाच्या तुलनेत काल चांदीच्या दरात प्रति ग्रॅम किंमत १ रूपयांनी तर एक किलो चांदी १००० रुपयाने वाढली होती.त्यामुळे आजही चांदीची किंमत प्रति ग्रॅम १०९ रुपये असून प्रति किलो किंमत १०९००० रुपये पातळीवर कायम आहे.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026





