LIVE UPDATES

११ वर्षे जुने विमान चालले होते ७,००० कि.मीच्‍या प्रवासावर...!

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि. 12) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (AI-171) हे विमान लंडनच्या दिशेने निघाले होते, पण टेकऑफनंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले. या अपघाताने संपूर्ण शहर हादरले, तर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल पोहचून बचावकार्य सुरू करण्यात आले.
Edited by: स्वप्निल परब
Published on: June 12, 2025 22:10 PM
views 1183  views

मुंबई : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि. 12) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर (AI-171) हे विमान लंडनच्या दिशेने निघाले होते, पण टेकऑफनंतर काही मिनिटांतच मेघानीनगर परिसरात कोसळले. या अपघाताने संपूर्ण शहर हादरले, तर आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस आणि रुग्णवाहिका तातडीने दाखल पोहचून बचावकार्य सुरू करण्यात आले. 

241 जणांचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त

या विमानात एकूण 242 जण होते. यात 230 प्रवासी, 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू मेंबर्स. हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघाले होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच, विमानाने नियंत्रण गमावले आणि एका निवासी इमारतीवर आदळले. या इमारतीत वैद्यकीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह असल्याचे समजते. अपघातानंतर मोठा स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या. घटनेचे गांभिर्य लक्षा घेऊन ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना आणि स्थानिकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.

11 वर्षे जुने, पण अत्याधुनिक विमान

हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान साडेअकरा वर्षे जुने होते. या प्रकारच्या विमानांचे आयुर्मान तब्बल 30 ते 50 वर्षे किंवा 44000 उड्डाण चक्र इतकी असते. 787-8 हे वाईड-बॉडी, मिड-साइज आणि लॉन्ग-रेंज विमान आहे. जे 254 प्रवासी घेऊन 13,620 किमीपर्यंत उड्डाण करू शकते. यामध्ये दोन शक्तिशाली इंजिन असतात. त्याची इंधन क्षमता सुमारे 1 लाख 26 हजार 206 लिटर आहे. तर हे विमान 954 किमी/तास कमाल वेगाने प्रवास करते. या विमानाची किंमत सुमारे 21.8 अब्ज रुपये आहे. अहमदाबाद ते लंडन ही सुमारे 7000 किमीची अंतराची फ्लाइट या विमानासाठी अगदी योग्य मानली जाते.

सुरक्षा आणि तांत्रिक वैशिष्ट्ये

कॉकपिटमध्ये अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टीम

सायबर सिक्युरिटीसाठी विशेष उपाय

प्रवाशांची आणि बॅगेजची काटेकोर तपासणी

इंटेलिजन्स शेअरिंगद्वारे संभाव्य धोके ओळखण्याची व्यवस्था

अधिकृत प्रतिक्रिया आणि पुढील तपास

सुरक्षा उपाय

रिडंडंट सिस्टिम्स : 787-8 विमानात अनेक प्रणाली रिडंडंट (backup) स्वरूपात आहेत, जसे की इंजिन, हायड्रॉलिक आणि इलेक्ट्रिकल सिस्टिम्स. यामुळे जर एखादी प्रणाली निकामी झाली, तरी दुसरी सक्रिय राहते आणि काम करत राहते.

अत्याधुनिक नेव्हिगेशन : GPS आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (ILS) यांच्या मदतीने वैमानिकांना अचूक नेव्हिगेशन मिळते.

आपत्कालीन प्रक्रिया : क्रू मेंबर्सना नियमितपणे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये आपत्कालीन लँडिंग, आग विझवणे आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळणे यांचा समावेश असतो.

साहित्य : 787-8 मध्ये हलक्या वजनाच्या कंपोझिट मटेरियल्सचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे हे विमान अधिक सुरक्षित आणि इंधन कार्यक्षम बनते.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026