LIVE UPDATES

‘तुझ्‍या गळा, माझ्‍या गळा.’...प्रेयसीचा चिरला गळा !

लग्‍न करण्‍यासाठी प्रेमी युगुल कर्नाटकातून गोव्‍यात
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 17, 2025 20:08 PM
views 2624  views

वादावादीनंतर प्रेयसीचा चिरला गळा 

फोंडा : प्रतापनगर येथे झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी बंगळुरु येथून एका संशयिताला अटक केली आहे. फोंडा पोलिसांनी तपास चक्रे गतीमान करत २४ तासांत संशयिताला अटक केली. तसेच, खून झालेल्या तरुणीची देखील ओळख पटली असून, चौकशीत अटक तरुणाने महत्वाची माहिती दिली आहे.

संजय केविन एम (२२, रा. उत्तर बंगळुरु, कर्नाटक) असे या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. तर, रोशिनी मोसेस एम. (२२, रा. उत्तर बंगळुरु, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रतापनगर येथे घनदाट जंगलात रोशिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृत तरुणी अज्ञात असल्याने खुनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

दरम्यान, फोंडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खून प्रकरणातील संशयित संजय केविनला बंगळुरु येथून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत संजयने महत्वाची माहिती दिली आहे. संजय आणि रोशिनी यांचे एकमेकांवर प्रेम होते, दोघांना लग्न करायचे होते. लग्न करण्यासाठीच ते बंगळुरुतून गोव्यात आले होते. गोव्यात आल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला यातच संजयने रोशिनीचा खून केला, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

या खून प्रकरणात आणखी सत्य समोर येण्याची शक्यता आहे. दोघे लग्न करण्यासाठी गोव्यात आले होते तर नेमके दोघांमध्ये काय बिनसले आणि प्रियकराने टोकाचे पाऊल उचलत प्रेयसीचा खून केला? याबाबत चौकशीतून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026