LIVE UPDATES

सर्वात महागडं युद्धविमान 48 तासांपासून त्रिवेंद्रम विमानतळावर

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 18, 2025 15:46 PM
views 2989  views

तिरुवनंतपुरम : ब्रिटिश रॉयल एअरफोर्सचे अत्याधुनिक फायटर जेट F-35 मागील ४८ तासांपासून उड्डाण करू शकलेले नाही. जगातील सर्वात महागडे विमान केरळच्या तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. खराब हवामान आणि इंधनाच्या कमतरतेमुळे केरळमध्ये विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आली होती.

हायड्रॉलिक बिघाडामुळे हे विमान मागील ४८  तासांपासून जमिनीवरच अडकले आहे. या जेटला पुन्हा HMS वेल्सकडे परतावे लागणार आहे. मात्र याचा संपूर्ण घटनाक्रम अनपेक्षित राहिला. त्रिवेंद्रममध्ये F-35B फायटर जेटची आपत्कालीन लँडिंग ही अमेरिकेच्या दाव्यांची पोलखोल करणारी ठरली आहे.

अमेरिका आणि इंग्लंड यांच्यातर्फे सतत दावा केला जातो की हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे रडारवर पकडले जात नाही. मात्र गंमत म्हणजे भारतीय वायुदलाने काही क्षणांतच हे फायटर जेट डिटेक्ट केले. भारतीय वायुदलाच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टिमने (IACCS) F-35 ओळखले आणि त्याची पुष्टीही केली. उड्डाण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वायुदलाने विमानाला उतरवण्यास मदत केली.

ब्रिटनचे F-35 फायटर जेट HMS वेल्स या कॅरिअर स्ट्राइक ग्रुपचा भाग आहे. अलीकडेच भारतीय लष्करासोबत सामूहिक सैन्य सरावात सहभागी झाले होते. हे विमान अरबी समुद्रात तैनात आहे.  F-35B फायटर जेट कॅरिअरवर लँडिंग करताना अपयशी ठरले. त्यानंतर इमर्जन्सी डायव्हर्जन घेत त्रिवेंद्रमच्या दिशेने उड्डाण झाले. भारतीय वायुदलाच्या IACCS प्रणालीने F-35 डिटेक्ट केले. F-35 च्या पायलटने तांत्रिक कारण देत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. लँडिंगनंतर समजले की विमानात हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड आहे. त्यामुळे पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

भारतीय वायुदलाने सांगितले की ही घटना नक्कीच असामान्य आहे, पण गंभीर नाही. एखाद्या विदेशी स्टेल्थ फायटर जेटचे ४८ तासांहून अधिक काळ भारतात जमिनीवर राहणे ही नक्कीच विशेष बाब आहे. F-35 हे छोटे रनवे किंवा विमानवाहू युद्धनौकांवरून शॉर्ट टेक ऑफसाठी डिझाईन केलेले आहे.

या विमानाच्या इंजिनपासून ते टर्बाइनपर्यंत सर्व काही मास्किंगसह झाकले गेले आहे. क्षेपणास्त्रे वगैरे विमानाच्या आतल्या भागात ठेवली जातात. F-35 एकाच वेळी शेकडो लक्ष्य ट्रॅक करून त्यावर हल्ला करू शकते. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड अॅरे (AESA) रडार बसवले गेले आहे. यामध्ये असलेली डिस्ट्रिब्यूटेड अॅपर्चर सिस्टीम (DAS) पायलटला ३६०  डिग्रीचा दृष्टीकोन देते.

या घटनेमुळे अमेरिका आणि इंग्लंडच्या F-35B संदर्भातील दाव्यांची पोलखोल झाली आहे. दोन्ही देश म्हणतात की F-35 रडारवर पकडला जात नाही. पण भारतीय वायुदलाच्या IACCS प्रणालीने ते सहजपणे डिटेक्ट केले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026