LIVE UPDATES

ATMमधून मिळतील 100 - 200 रुपयांच्या नोटा

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: June 18, 2025 15:49 PM
views 2765  views

मुंबई  : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने बँकांना त्यांच्या एटीएममधून ₹ १०० आणि ₹ २०० च्या लहान नोटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. आता बँकांनी या दिशेने चांगली प्रगती केली आहे. आरबीआयने घेतलेल्या एका निर्णयाचा परिणाम आता बाजारात दिसत आहे. देशातील ७३ टक्के एटीएममधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटांना भरण्यास सुरुवात केली आहे. एका अहवालानुसार, देशातील ७३% एटीएम आता अशा आहेत की किमान एका कॅसेटमधून ₹ १०० किंवा ₹ २०० च्या नोटा वितरित केल्या जात आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये ही संख्या ६५% होती, याचा अर्थ आता सतत सुधारणा होत आहे.

सामान्य लोकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी सहज लहान नोटा मिळाव्यात, जेणेकरून त्यांना गरजेच्या वेळी दुकानांमध्ये किंवा बँकांमध्ये नोटा बदलण्याची समस्या भेडसावू नये, हा RBIचा उद्देश आहे. विशेषतः ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

सीएमएस इन्फो सिस्टम्सचे रोख प्रबंधक अध्यक्ष अनुश राघवन यांनी सांगितले की, नोटांची उपलब्धता सुधारत आहे. ग्राहकांच्या खर्चाचे ६० टक्के प्रमाण आताही रोखीनेच होत आहे. अशा गावखेड्यात खासकरुन १०० आणि २०० रुपयांच्या नोटांची उपलब्धता दिवसेंदिवस देवाण-घेवाण संबंधीच्या गरजा थेट पूर्ण करीत आहे. एटीएममध्ये लहान नोटा असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून लोकांना दैनंदिन खरेदी आणि लहान व्यवहारांमध्ये अडचणी येऊ नयेत.

आरबीआयने एप्रिल २०२५ मध्ये एक परिपत्रक म्हणजेच मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, ज्यामध्ये असे म्हटले होते की ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, सर्व बँकांना त्यांच्या एटीएमपैकी किमान ७५% एटीएममध्ये १०० किंवा २०० च्या नोटा वितरित होतील याची खात्री करावी लागेल. त्यानंतर, ३१ मार्च २०२६ पर्यंत हा आकडा ९०% पर्यंत वाढवावा लागेल. यामुळे देशातील बहुतेक एटीएममध्ये लहान चलनी नोटा उपलब्ध होतील, ज्यामुळे लोकांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अधिक सोय मिळेल.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026