LIVE UPDATES

फक्त ३ हजार रुपयांमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
Edited by: ब्‍युरो
Published on: June 19, 2025 16:03 PM
views 894  views

नवी दिल्ली :-  केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे FASTag बद्धलची घोषणा केली. वाहनचालकांसाठी लवकरच फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू होणार आहे. या नव्या योजनेंतर्गत वाहनधारकांना ३ हजार रुपयात वर्षभर (२०० ट्रीप) टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. आगामी १५ ऑगस्ट २०२५ पासून ही योजना लागू होईल.

गडकरींनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आगामी १५ ऑगस्टपासून सुरू होणारी ही पास केवळ गैर-व्यावसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल. पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल) वैध राहील. वार्षिक पासमुळे देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून सहज आणि किफायतशीर प्रवास करता येईल, असे गडकरींनी म्हंटले आहे.

नवीन धोरण- "नवीन धोरण ६० किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्यांसंदर्भातील जुन्या समस्यांचे निराकरण करते आणि एकाच, परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणे सुलभ करते. टोलनाक्यांवरील वेळ कमी करणे, वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहन मालकांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणे, हा या वार्षिक पासचा उद्देश असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. इच्छुक 'राजमार्ग यात्रा' या अधिकृत अ‍ॅपद्वारे हा पास अ‍ॅक्टिवेट करू शकतील. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनही पास मिळवता येईल.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026