कणकवली : ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग हा तिसऱ्या नंबरचा खेळ आहे. सिंधुदुर्गातून बॉक्सिंगचे राष्ट्रीय व आंतराराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावेत याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२२ ही आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य असून भाविष्यात ही स्पर्धा पुन्हा कणकवली भरविण्याचा संघटनेचा मानस असल्यास नगरपंचायतीचे क्रीडासंकुलातील जागा उपलब्ध दिली जाईल.
तसेच सिंधुदुर्गातून बॉक्सिंगपटू तयार व्हावेत याकरिता सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशन पुढाकार घेतला असून या संघटनेला आपण सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२२ २२ ते २८ जून या कालावधीत येथील चौंडेश्वरी सांस्कृतिक भवनात पार पडली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक संजय कामतेकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त मनोज पिंगळे, क्रीडा अधिकारी विद्या शिरस, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशनचे अध्यक्ष अभिमन्यू रासम उपाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव डॉ. राजाराम दळवी, सदस्य संतोष गुराम, खजिनदार कृष्णाजी मातेफोड, सल्लागार विजय घरत, सदस्य सर्वेश दळवी, राजन जोथाडी, आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. राजाराम दळवी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशन कोकणात प्रथमच आयोजित केलेल्या बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १९ व्या युवा महिला गटातील स्पर्धेत ९४ तर ८० पुरुष गटातील स्पर्धेत २१२ स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमदार नीतेश राणे, आमदार बाळाराम पाटील, जि.प.च्या माजी अध्यक्ष सौ. संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सहकार्य केले. बॉक्सिंग खेळात सिंधुदुर्गातील खेळाडूचा अल्प सहभाग असून या खेळात जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग वाढवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टीयुद्ध असोसिएशनतर्फे शालेय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ८० व्या पुरुष बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पदके पटकाविलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेत गोल्ड मेडल अब्बास मोहम्मद साबुनी राहणार पुणे शहर च्या बारावीत शिकरऱ्या विद्यार्थ्याने पटकावले तर सिल्वर तेजस देवरे धुळे यांना पटकावले व ब्राँस पदके पटकाविलेल्या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. बेस्ट बॉक्सर म्हणून मोहमंद आयन तर बेस्ट प्रोमिसिंग हर्ष पैलवान म्हणून गौरविण्यात आल. तसेच या स्पर्धेकरिता पंच म्हणून काम पाहिलेल्यांचा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने क्रीडा रसिक उपस्थित होते.
ताजी बातमी
View all








