LIVE UPDATES

धारगळ ॲसिड हल्ला : घटनेमागे प्रेमप्रकरण..? | कुटुंबीयांची शंका

Edited by:
Published on: June 30, 2025 15:24 PM
views 3488  views

पणजी : धारगळ येथील सुकेकुळण भागात सोमवारी सकाळी ७.५० वाजता एका १७ वर्षीय युवकावर झालेल्या ॲसिड हल्ल्याने  खळबळ मजली आहे.  या हल्ल्यात ऋषभ शेट्ये (वय १७) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ऋषभ शेट्ये हा युवक म्हापशातील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे त्याला वडिलांनी बस स्टॉपवर सोडले व ते निघून गेले. ऋषभ बसची वाट पाहत उभा होता. सकाळी ७.३० च्या दरम्यान एका दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांपैकी एकाने त्याच्यावर थेट अॅसिड फेकले आणि घटनास्थळावरून पळ काढला. अॅसिड अंगावर पडल्यानंतर अंग होरपळू लागल्याने तो जीव वाचवण्यासाठी धावला. दरम्यान त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवून मदतीसाठी याचना केली, पण कुणी थांबले नाही. काहीवेळाने एक वाहन थांबले. त्यानंतर ऋषभला म्हापसातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ऋषभचे वडील रुग्णालयात हजर झाले. प्राथमिक उपचार दिल्यानंतर जखमी अवस्थेत ऋषभला तातडीने गोमेकॉत हलवण्यात आले. ऋषभ हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे.

याप्रकरणी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. आर्लेकरांनी ऋषभच्या कुटुंबियांची भेट घेतली व या हल्ल्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा हल्ला कुणी केला व का केला याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कुटुंबियांपैकी एकाने ही घटना प्रेम प्रकरणामुळेच घडली असावी अशी शक्यता व्यक्त केल्याचे आर्लेकरांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले. त्याच अनुषंगाने त्यांनी पोलिसांना तपास करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आर्लेकरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभच्या उजव्या डोळ्याला गंभीर इजा पोहोचली असून शरीर ३० टक्क्यांपर्यंत भाजले आहे. दरम्यान ऋषभ सध्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचीही माहिती समोर आली असून त्याच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहेत. 

हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पेडणे पोलीस स्थानकाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्याचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोर कोण होता, त्याची ओळख पटलेली नाही. पेडणे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. काही वेळाने ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हल्लेखोरांनी वापरलेल्या बकेट आणि आतमधील रसायनाचे नमुने घेतले.  उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनीही या ठिकाणी दाखल होऊन पाहणी केली असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.




ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026