LIVE UPDATES

जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेत दुर्गा जाधवला सुवर्ण पदक

Edited by:
Published on: August 08, 2025 18:45 PM
views 416  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गनगरी इथं झालेल्या जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेत कुमारी दुर्गा दिनेश जाधव हिने १४ वर्षाखालील वयोगटात सुवर्ण पदक पटकावले. दुर्गा ही सिंधुदुर्ग जिल्हा जुडो कराटे असोसिएशनची विद्यार्थिनी आहे. दुर्गा ही   प्रशिक्षक वसंत जाधव यांची नात असून दिनेश जाधव यांची कन्या आहे. 

दुर्गाने यापूर्वीही अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.