LIVE UPDATES

अफगाणला शक्तिशाली भूकंपाचा धक्का

800 हून अधिक मृत्युमुखी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: September 01, 2025 22:49 PM
views 4584  views

काबूल : अफगाणिस्तानमध्ये सोमवारी झालेल्या 6.3 रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपाने मोठी जीवितहानी झाली असून, मृतांचा आकडा 800 वर गेला आहे. 3 हजारांवर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे झालेल्या विध्वंसात आणि ढिगार्‍याखाली अडकलेल्या बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा मोठा आहे; परंतु भूकंपाचा परिसर दुर्गम असल्याने बचाव पथके अजूनही घटनास्थळी कार्यरत आहेत.

6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप नंगरहार प्रांतातील जलालाबादजवळ झाला. या मुख्य धक्क्यानंतर, भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून जवळच सुमारे 140 कि.मी. खोलीवर 4.7 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का बसला.

2023 नंतरचा सर्वात विनाशकारी भूकंप

सोमवारचा भूकंप हा 2023 नंतर या प्रदेशात झालेला सर्वात विनाशकारी भूकंप आहे. दोन वर्षांपूर्वी, या प्रदेशात 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता आणि त्यानंतर तीव्र धक्के बसले होते. तालिबानच्या म्हणण्यानुसार, त्या भूकंपात सुमारे 4,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तथापि, संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, किमान 1,500 लोकांचा मृत्यू झाला होता.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026