LIVE UPDATES

जिओ ट्रू ५-जी आता गोव्यातील पणजीमध्ये ! ; १७ राज्यांतील ५० शहरांमध्ये एकाच दिवशी ५-जी सेवा सुरू

गोव्यामध्ये ५-जी लाँच करणारा जिओ हा पहिला आणि एकमेव ऑपरेटर, भारतातील १८४ शहरे आता जिओ ५-जी च्या आवाक्यात
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 24, 2023 17:19 PM
views 505  views

पणजी : गोव्याची राजधानी पणजी शहर मंगळवारी जिओ ट्रू ५-जी नेटवर्कशी जोडले गेले. याचवेळी १७ राज्यातील ५० शहरांमध्ये एकाच दिवशी ५-जी लाँच करून जिओने एकप्रकारे विश्वविक्रम केला.

मंगळवारपासून, जिओ वेलकम ऑफर पणजी सह १७ राज्यांमधील ५० शहरांमध्येही सुरू झाली.   ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय १ Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.

याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “पणजीमध्ये जिओची ५-जी सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून पणजी शहरात ५-जी सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे.

आम्ही जिओ ट्रू ५-जी तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह पणजी आणि गोव्यातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात  फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. गोवा डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही गोवा सरकारचे आभारी आहोत.”

मंगळवारपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.


जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने ४-जी नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू ५-जी नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू ५-जीसह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते. जसे की, कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, ५-जी व्हॉईस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाईसिंग.

जिओ ट्रू ५-जी सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ ५-जी नेटवर्क सुसंगत ५-जी हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी ५-जी नेटवर्कची उपलब्धता तसेच  प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी २३९ किंवा अधिक  वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026