LIVE UPDATES

BIG BREAKING | आरोग्यमंत्र्यांवर पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार

प्रकृती गंभीर
Edited by: ब्युरो
Published on: January 29, 2023 16:53 PM
views 1118  views

ओडिसा : ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रीआणि ज्येष्ठ बिजू जनता दल नेते नबा दास  यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात आज ब्रजराजनगरमध्ये दिवसाढवळ्या  एका सहाय्यक उपनिरीक्षकाने नबा दास यांच्यावर गोळीबार केल्याने गंभीर जखमी झाले आहेत. 

60 वर्षीय दास हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गांधी चौकात आपल्या कारमधून उतरत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल दास यांनी त्याच्यावर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गुप्तेश्वर भोई यांनी सांगितले की, नबा दास यांच्या छातीवर डाव्या बाजूला गोळ्या लागल्या आहेत. एएसआयच्या रिव्हॉल्व्हरमधून काही गोळ्या लागल्याने शेजारी असलेला एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. एएसआयने मंत्र्यांवर गोळीबार का केला? हे जाणून घेण्यासाठी आम्ही एएसआयची चौकशी करत असल्याचेही  भोई यांनी सांगितले. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026