LIVE UPDATES

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती

Edited by:
Published on: March 06, 2026 11:43 AM
views 618  views

नवी दिल्ली : देशातील महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तेलंगणासह अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळत होते.

जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील एक अनुभवी आणि वजनदार राजकारणी मानले जातात. त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या वर्मा यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून 2018 ते 2023 या काळात अर्थ आणि ऊर्जा यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. राजकारणासोबतच त्यांना साहित्य आणि कलेची प्रचंड आवड असून ते एक लेखक आणि कवी म्हणूनही परिचित आहेत. महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर असेल.

इतर राज्यांमधील महत्त्वाच्या नियुक्त्या


बिहार : निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांची बिहारच्या राज्यपालपदी वर्णी लागली आहे.

पश्चिम बंगाल : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांची आता पश्चिम बंगालमध्ये बदली करण्यात आली आहे.

तेलंगणा : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला आता तेलंगणाची धुरा सांभाळतील.

तामिळनाडू : केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

नागालँड : ज्येष्ठ नेते नंद किशोर यादव यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.

हिमाचल प्रदेश : लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026