LIVE UPDATES

सार्वजनिक ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा आदेश कायम

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: May 19, 2026 20:38 PM
views 505  views

नवी दिल्ली : सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असून सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंबंधीच्या विविध याचिकांवर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणांहून भटके कुत्रे हटवण्याचा आदेश कायम राहील. भटक्या कुत्र्यांसंबंधीचा पूर्वीचा २०२५ चा आदेश अंमलात राहील. यावेळी न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारीया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. न्यायालयाने प्राणी कल्याण मंडळाचे सर्व अर्जही फेटाळून लावले. न्यायालयाने म्हटले की, हा सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची समस्या ही एक गंभीर चिंतेची बाब आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशात रेबीजमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यांनी प्राणी जन्म नियंत्रणाची अंमलबजावणी केली पाहिजे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही राज्याची जबाबदारी आहे. राज्यांनी पूर्वीच्या आदेशांचे योग्यरित्या पालन केलेले नाही. जर त्यांनी पालन केले नाही, तर त्यांना अवमान कारवाईला सामोरे जावे लागेल. कुत्रे लहान मुलांना आणि वृद्धांना चावत आहेत; आपण याकडे डोळेझाक करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने २०२५ च्या आदेशात सुधारणा करण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, जुना आदेश अंमलात राहील. हे लक्षात घ्यावे की, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना आश्रयगृहांमध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026