वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथील युवा बुद्धिबळपटू विहान राहुल अस्पतवार याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बुद्धिबळ इतिहासात मानाचा ठसा उमटवला आहे. अवघ्या नऊव्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) शास्त्रीय प्रकारात १५४१ मानांकन गुण प्राप्त करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंडर-१० गटातील पहिला FIDE मानांकनप्राप्त बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला आहे.
सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत विहानने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशामुळे वैभववाडी तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून बुद्धिबळ क्षेत्रात हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
विहान याने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात राहूनही जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर अवघ्या तीन वर्षांत आंतरराष्ट्रीय मानांकनाचा टप्पा गाठला. त्याच्या या यशामागे त्याच्या आई-वडिलांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन, त्याग आणि भक्कम पाठबळ लाभले आहे. तसेच प्रदीप पाटील, बाबुराव पाटील, अविजित रे, श्रीकृष्ण आडेलकर आणि विजयकुमार माने यांचं मार्गदर्शन लाभले.
सध्या विहान हा आचिर्णे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिबळपटू, प्रशिक्षक, विविध क्रीडा संघटना, शैक्षणिक संस्था आणि मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026





