देवगड : तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी सोमेश पंढरीनाथ मणचेकर याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक (ब्राँझ मेडल) पटकावले. राज्यभरातून सहभागी झालेल्या गुणवंत खेळाडूंमध्ये सोमेशने आपल्या जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट तांत्रिक कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय खेळ सादर केला. त्याच्या या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, देवगड तालुक्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे. सोमेशला श्रीमती शेवंता नाईक मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
सोमेशच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, संचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, क्रीडा विभाग, पालक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी
View all








