LIVE UPDATES

Maharashtra Weather Alert : कोकणासह 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

18 राज्यांना हवामान विभागाने जारी केला अलर्ट
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 27, 2026 12:57 PM
views 297  views

नवी मुंबई : राज्यभरात मुसळधार कोसणाऱ्या पाऊसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. यानंतर पुन्हा काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. .  राज्यातील काही भागात पाऊसाने धुवाधार बॅटिंग केल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नाशिक, कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून मुंबई, गडचिरोली, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात आज पाऊस हजेरी लावणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 12 तासांत 18 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतापासून ते पूर्व व मध्य भारतापर्यंतच्या राज्यांमध्ये हवामान तिव्र राहण्याची शक्यता असून काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये 27 जुलैरोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026