LIVE UPDATES

बंपर डिस्काऊंटसह 'या' तारखेपासून सुरु होणार अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टचा फ्रिडम सेल

Freedom Sale 2026 : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स असलेल्या अ‍ॅमेझॉनने (Amazon) ग्रेट फ्रिडम सेल (Great Freedom Sale) ७ ऑगस्ट २०२६ पासून आणि फ्लिपकार्टने (Flipkart) फ्रिडम सेल (Freedom Sale) ८ ऑगस्ट २०२६ पासून सुरु होण्याची घोषणा केली आहे. तसेच, फ्लिपकार्ट प्लस (Flipkart Plus), ब्लॅक (Black) आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये ७ ऑगस्टपासूनच खरेदी करता येईल.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 28, 2026 13:59 PM
views 225  views

Independence Day Sale 2026 : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, घरगुती उपकरणे किंवा इतर कोणतेही गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येत्या 7 आणि 8 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनने सर्व ग्राहकांसाठी सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये ग्राहकांना बँक सवलती, एक्सचेंज ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय (EMI) पर्याय, कॅशबॅक आणि पैशांची बचत करणाऱ्या विविध ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स असलेल्या अ‍ॅमेझॉनने (Amazon) ग्रेट फ्रिडम सेल (Great Freedom Sale) ७ ऑगस्ट २०२६ पासून आणि फ्लिपकार्टने (Flipkart) फ्रिडम सेल (Freedom Sale) ८ ऑगस्ट २०२६ पासून सुरु होण्याची घोषणा केली आहे. तसेच, फ्लिपकार्ट प्लस (Flipkart Plus), ब्लॅक (Black) आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये ७ ऑगस्टपासूनच खरेदी करता येईल.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम सेल (Amazon Great Freedom Sale) 
अ‍ॅमेझॉनचा ग्रेट फ्रिडम सेल ७ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल. यावेळी कंपनी बिग सेव्हिंग फॉर एव्हरिवन (Big Savings for Everyone) या संकल्पनेखाली हा सेल आयोजित करत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि दैनंदिन वापराच्या वस्तू यांसारख्या श्रेणींमध्ये आकर्षक ऑफर्स मिळण्याची अपेक्षा आहे. या सेल दरम्यान, ग्राहक एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि ईझी ईएमआय व्यवहारांवर १० टक्के त्वरित सवलत मिळवू शकतात.  ग्राहक एक्सचेंज ऑफर्सचा (exchange Offer) लाभ घेऊ शकतात. तसेच नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय, अॅमेझॉन कूपन्स आणि विविध श्रेणींमधील विशेष ऑफर्स देखील उपलब्ध असतील.

फ्लिपकार्ट 'फ्रीडम सेल' (Flipkart Freedom Sale)
फ्लिपकार्टचा 'फ्रीडम सेल' सर्व ग्राहकांसाठी ८ ऑगस्ट रोजी सुरू होईल. मात्र, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स, ब्लॅक मेंबर्स आणि फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड ग्राहकांना या सेलचा लाभ ७ ऑगस्टपासून घेता येईल. सेलदरम्यान एसबीआय (SBI) क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना १० टक्के सूट (instant discount) मिळेल; ही ऑफर निवडक ईएमआय (EMI) व्यवहारांवरही लागू असेल. तसेच फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि निवडक श्रेणींवर अतिरिक्त सवलती मिळण्याची अपेक्षा आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026