LIVE UPDATES

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Gold Silver Price Update : २४ कॅरेट सोने हे सुमारे ९९.९ टक्के शुद्ध असते, म्हणूनच त्याची सर्वाधिक किंमत असते. मात्र, ते खूप मऊ असल्याने त्याचा वापर सहसा दागिने बनवण्यासाठी केला जात नाही. सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 29, 2026 17:58 PM
views 311  views

मुंबई : मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. आज 29 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 42 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर चांदी 620 रुपयांनी वधारल्याने 2 लाख 17 हजार रुपयांवर दर आहे.  

मंगळवार, 29 जुलै रोजी सोन्याच्या दरात 1.17 टक्क्यांनी घट झाली आहे.  24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 42 हजार रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 30 हजार रुपये इतका आहे. सोन्याच्या दरांमध्ये शहरांनुसार बदर असू शकतात.

मुंबईतील आजचे सोने व चांदीचे दर

मुंबईत २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,०२० रुपये आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३०,१८५ रुपये आहे. तर चांदीचा प्रतिकिलो भाव 2 लाख 17 हजार 100 रुपये ऐवढा आहे. जून महिन्याच्या अखेरीपासून सोन्याचे भाव प्रति औंस ४,००० डॉलर्सच्या आसपास राहिले आहेत. सोन्याने यापूर्वी प्रति औंस सुमारे ५,६०० डॉलर्सचा उच्चांक गाठला होता, परंतु त्यानंतर त्यात २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

२२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील फरक

२४ कॅरेट सोने हे सुमारे ९९.९ टक्के शुद्ध असते, म्हणूनच त्याची सर्वाधिक किंमत असते. मात्र, ते खूप मऊ असल्याने त्याचा वापर सहसा दागिने बनवण्यासाठी केला जात नाही. सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.

बीआएस हॉलमार्क आणि एचयूआयडी नंबर तपासूनच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करा.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026