LIVE UPDATES

Mid Day Meal : शालेय विद्यार्थ्यांच्या 'मिड डे मिल'मध्ये मिळणार चिकन बिर्याणी?

Chicken biryani In midday meal : चिकन बिर्याणीची ही योजना राबवण्यासाठी तमिळनाडूच्या शालेय पोषण आहार योजनेत बदल केले जातील. या नवीन बदलांचा एक भाग म्हणून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 16:29 PM
views 314  views

नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यात महिलांच्या सुरक्षेसाठी टास्क फोर्सची स्थापना, 200 युनिट मोफत वीज यासह अनेक निर्णयांचा समावेश आहे. दरम्यान, आता तामिळनाडूचे राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात म्हणजेच दुपारच्या जेवणात आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याचा विचार करीत आहे. याबाबतची संकल्पना राज्य शिक्षण मंत्री राजमोहन यांनी मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याकडे मांडली आहे.

'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार, चिकन बिर्याणीची ही योजना राबवण्यासाठी तमिळनाडूच्या शालेय पोषण आहार योजनेत बदल केले जातील. या नवीन बदलांचा एक भाग म्हणून सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जात आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी अलीकडेच ही कल्पना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासमोर मांडल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

प्रस्तावावर चर्चा करताना शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी तमिळनाडूचा राजकीय इतिहास आणि मुलांसाठीच्या मागील पोषण आहार कार्यक्रमांचा संदर्भ दिला. राजमोहन म्हणाले, "के. कामराज यांनी 'मध्यान्ह भोजन योजना' सुरू केली, कलैग्नार करुणानिधी यांनी त्यात अंड्यांचा समावेश केला, एमजीआर यांनी त्याचे रूपांतर 'पौष्टिक आहार कार्यक्रमात' केले आणि जयललिता यांनी आठवडाभर अंड्यांच वाटप सुरु ठेवले. त्याचप्रमाणे, आमच्या सरकारच्या काळात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एका दिवशी चिकन बिर्याणी दिली जावी, अशी आमची इच्छा आहे." सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री विजय या प्रस्तावाचा आढावा घेत आहेत आणि अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026