LIVE UPDATES

ओडिशासह मध्य, दक्षिण गुजरात, आसामला पुराचा तडाखा; हिराकूडचे 14 दरवाचे उघडले

OdishaFloods : ओडीशातील महानदीवरील हिराकूड धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी 20 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 12:25 PM
views 549  views

नवी दिल्ली : महानदीचा छत्तीसगडमध्ये उगम झाला असून परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नदीची पातळी वाढत आहे. त्यामुळे ओडीशातील महानदीवरील हिराकूड धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी 20 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जगतसिंगपूर, खुर्दा, कटक, पुरी या जिल्हांना पुराचा फटका बसला असून सात लाखांहून अधिक लोक बाधित झाले. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तसेच राज्याच्या आपत्कालीन यंत्रणांची 136 पथके कार्यरत आहे अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

दक्षिण, मध्य गुजरातमध्ये शुक्रवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. सखल भागांत पाणी साचल्याने पुरस्थिती निर्माण झाली असून सुरतमधील 1500 लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. एसडीआरएफची ३३, एनडीआरएफची १७ पथके बचाव कार्यासाठी विविध भागांत तैनात असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

काश्मीरलाही पावसाने तडाखा दिला आहे. येथील बडगाम, बारामुल्ला आणि बांदीपोरा भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तसेच रस्ते वाहतूक कोलमडली आहे. आसाममध्येही पावसामुळे 80 लोक मृत्यूमुखी झाल्याची माहिती समोर आली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026