LIVE UPDATES

7 हजार रुपयांच्या डिस्काऊंटमध्ये खरेदी करता येणार विवोचा 'हा' फोन, वाचा सविस्तर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 03, 2026 17:25 PM
views 255  views

Vivo V50 Specifications : येत्या 7 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर लवकरच 'फ्रीडम डे सेल' सुरू होणार आहे. परंतु त्याआधीच विवोचा प्रीमियम स्मार्टफोन 'विवो वी 50' (Vivo V50) मोठ्या ऑफर्ससह खरेदी करता येणार आहे. हा प्रीमियम आणि सर्वात स्लिम (ultra-slim) एआय स्मार्टफोन आता पूर्वीपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी करता येईल. केवळ किंमतच नाही, तर या फोनचे फिचर्सही त्याला या कॅटेगरीतील इतर फोनपेक्षा वेगळे ठरवतात. सध्या फ्लिपकार्टवर यावर ७ हजार रुपयांपेक्षा जास्त डिस्काऊंट दिला जात आहे. चला तर या ऑफर्सची माहिती जाणून घेऊया.

विवो वी 50 वर ७ हजार २०० रुपयांची थेट डिस्काऊंट दिला जात आहे. यापूर्वीच्या दरवाढीनंतर या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये झाली होती. मात्र, आता तो फ्लिपकार्टवर ३० हजार ७९९ रुपयांना उपलब्ध आहे. किंमत कमी करण्यासोबतच फ्लिपकार्ट अतिरिक्त ऑफर्सही देत ​​आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना १ हजार ५४० रुपयांपर्यंतची इंन्स्टंट डिस्काऊंट मिळू शकतो. याव्यतिरिक्त, हा फोन 'नो-कॉस्ट ईएमआय' पर्यायासह उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे जुना स्मार्टफोन असेल, तर जुन्या स्मार्टफोनचे मॉडेल आणि स्थितीनुसार तुम्हाला २३ हजार ७०० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज मूल्यही मिळू शकते.

या फोनमध्ये ६,००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे बॅटरी वेगाने चार्ज होऊ शकते. तसेच या फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा ६.७ इंचाचा 'क्वाड-कर्व्हड' फुल एचडी प्लस एमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा पीक ब्राइटनेस ४ हजार ५०० निट्स इतका असून हा फोन एचडीआर मोडलाही सपोर्ट करतो. यात स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ (Snapdragon 7 Gen 3) प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये 'सर्कल टू सर्च', 'एआय ट्रान्सक्रिप्ट' आणि 'एआय लाइव्ह कॉल ट्रान्सलेशन' यांसारखे विविध एआय फिचर्सचा समावेश आहे.

फोनच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, याच्या पुढील बाजूसही ५० मेगापिक्सलचा सेन्सर आहे. हे तिन्ही कॅमेरे 4 के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात.




ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026