LIVE UPDATES

Nathan Thomas : 18 व्या वर्षी युवा प्राध्यापक बनत थॉमसने मोडला ३०६ वर्षांचा विक्रम

जगातील सर्वात तरुण पुरुष प्राध्यापक : गिनिज बुकमध्ये नोंद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 04, 2026 16:47 PM
views 297  views

नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या नॅथन थॉमसने वयाच्या १८ वर्षे आणि ३४६ व्या दिवशी महाविद्यालयीन प्राध्यापक बनून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवले आहे. थॉमसनने हा विक्रम करुन तरुणांसाठी आदर्श निर्माण केला आहे. या कामगिरीसह त्याने ३०६ वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे. 

नॅथनची 'मियामी डेड कॉलेज'मध्ये अभियांत्रिकी प्रशिक्षक (इंजिनिअरिंग इन्स्ट्रक्टर) म्हणून नियुक्ती झाली आहे, जिथे तो अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग आणि तांत्रिक विषय शिकवतो. मात्र, यातील विशेष बाब म्हणजे त्याच्या वर्गातील अनेक विद्यार्थी त्याच्याच वयाचे आहेत. नॅथन अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आला आहे आणि त्याला लहानपणापासूनच गणित व विज्ञानाची आवड आहे. गणितातील कठीण  समस्या सहजपणे समजून घेण्यास त्याच्या आईने त्याला मदत केली असे तो सांगतो. नॅथनने अगदी लहान वयातच महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. त्यानंतर त्याने 'फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी'मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

अभियांत्रिकीचे अध्यापन करण्यासोबतच, नॅथन 'युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ लॉ'मध्ये कायद्याचे शिक्षणही घेत आहे. तसेच, भविष्यात 'बौद्धिक संपदा कायद्याच्या' क्षेत्रात काम करण्याचा त्याचा मानस आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित नवीन शोधांच्या कायदेशीर संरक्षणासाठी योगदान देणे हे त्याचे ध्येय आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026