LIVE UPDATES

Tarun Tejpal : महिला पत्रकारावरील लैगिंक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपाल दोषी

उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा निर्णय : १० वर्षांची शिक्षा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 06, 2026 16:47 PM
views 310  views
Former Tehelka editor Tarun Tejpal convicted by Bombay High Court in 2013 sexual assault case

पणजी : शोधपत्रकारितेसाठी देशभर ओळखल्या जाणाऱ्या 'तहलका'चे संस्थापक आणि माजी संपादक तरुण तेजपाल यांना एका लैंगिक अत्याच्यार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. मे 2021 मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय गुरुवारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आणि २०१३ मधील महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याच्यार प्रकरणात त्यांना दोषी ठरवले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान तेजपाल हे न्यायालयात उपस्थित होते. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने हा निकाल जाहीर केला. दोषी ठरविण्यात आलेल्या तेजपाल यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण नोव्हेंबर २०१३ मधील आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर २०१३ रोजी, 'तहलका' मासिकातर्फे गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 'थिंक फेस्ट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात जगभरातील नामवंत व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान, तरुण तेजपाल यांनी हॉटेलच्या लिफ्टमध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिला पत्रकार सहकाऱ्याने केला होता. यावेळी पीडित महिला 'तहलका'मध्ये कनिष्ठ पत्रकार म्हणून कार्यरत होती. कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये तेजपाल यांनी दोनदा आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला होता.

या घटनेनंतर देशभरात 22 नोव्हेंबर 2013 रोजी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या आरोपांची दखल घेत पोलिसांनी स्वतःहून तेजपाल यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि इतर अजामीनपात्र गुन्ह्यांप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर तेजपाल यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 रोजी तेजपाल यांना अटक करण्यात आली. सत्र न्यायालयात बराच काळ चाललेल्या या प्रकरणात मे 2021 मध्ये म्हापसा सत्र न्यायालयाने पिडितेच्या वर्तनावर शंका तसेच सबळ पुराव्यांच्या अभावामुळे तेजपाल यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. 

दरम्यान, गोवा सरकारने निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली होती. 13 वर्ष चाललेल्या या कायदेशीर लढ्यात गोवा खंडपीठाने गुरुवारी सरकारी पक्षाचे पुरावे ग्राह्य धरत तरुण तेजपाल यांना अखेर दोषी ठरवले. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026