LIVE UPDATES

Bengaluru Food Safety Raid : बंगळूरुमधील मोठ्या हॉटेल्स, पबमध्ये मिळाले कुजलेले 45 किलो मांस, मुदत संपलेले दूध

मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात खराब झालेले, एक्सपायर्ड आणि अयोग्य पद्धतीने साठवलेले खाद्यपदार्थ आढळून आले. एकूण १३२ किलो खाद्यपदार्थ आणि सुमारे १५ लिटर वापरलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले. विभागाच्या या कारवाईवरून आगामी काळात अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवरील देखरेख अधिक कडक करण्यात येणार आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 14:10 PM
views 486  views
Bengaluru Food Safety Raid

बंगळुरु : बंगळुरूमध्ये एका मोठ्या कारवाईमुळे शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या कार्यपद्धती आणि मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्नसुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाच्या पथकांनी विविध भागांमधील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर आणि साठवणूक केंद्रांची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात खराब झालेले, एक्सपायर्ड आणि अयोग्य पद्धतीने साठवलेले खाद्यपदार्थ आढळून आले. एकूण १३२ किलो खाद्यपदार्थ आणि सुमारे १५ लिटर वापरलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले. विभागाच्या या कारवाईवरून आगामी काळात अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या आस्थापनांवरील देखरेख अधिक कडक करण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने बंगळुरू शहरी जिल्हा आणि बीबीएमपी क्षेत्रांत या विशेष मोहिमेसाठी ३० पथके तैनात केली होती. या पथकांमध्ये 'नियुक्त अधिकारी' आणि 'अन्न सुरक्षा अधिकारी' यांचा समावेश होता. ८ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या तपासणी मोहिमेत प्रामुख्याने ज्या मोठ्या हॉटेल्स, केटरर्स आणि विविध संस्थांना मांस, मासे व इतर खाद्यपदार्थ पुरवतात अशा साठवणूक केंद्रांना आणि अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थांची गुणवत्ता, साठवणुकीच्या पद्धती, स्वच्छतेचे निकष आणि सुरक्षा नियमांचे पालन यांबाबत तपासणी केली. 

'स्काय लाउंज'मधील तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना किचनमध्ये खराब झालेले चिकन आणि बीफ आढळले. रिपोर्टसनुसार, या मांसावर बुरशी दिसून आली. तपासणी पथकाने एकूण ५१ किलो खाद्यपदार्थ खाण्यायोग्य नसल्याचे घोषित केले. यामध्ये सुमारे ४५ किलो खराब झालेले चिकन आणि बीफ, तसेच गुणवत्ता निकष पूर्ण न करणारे ६ किलो व्हेजिटेबल कटलेट्स यांचा समावेश होता. हे सर्व खाद्यपदार्थ नियमांनुसार नष्ट करण्यात आले. याव्यतिरिक्त, किचनमध्ये साठवलेले दूध आणि दही यांची मुदत संपली होती. अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले की या उत्पादनांची मुदत संपून सुमारे १० दिवस झाले होते. कारवाईदरम्यान, १५ लिटर वापरलेले खाद्यतेलही काढून टाकण्यात आले.

दरम्यान, ही कारवाई केवळ एका पबपुरती मर्यादित नव्हती. अन्नसुरक्षा विभागाच्या पथकांनी बंगळुरूमधील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. 'रॉयल ​​चेन हॉटेल'मधून ५० किलो बदकाचे मांस आणि ५ किलो मासे जप्त करण्यात आले. 'मद्रास किचन'मधून ५ किलो मटार आणि 'टेस्कॉन हॉटेल'मधून ५ किलो मशरूम जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी 'सांचेझ हॉटेल'मधून ३ किलो मासेही जप्त केले. तसेच, केक, बटाटे आणि टॅकोस यांसारखे सुमारे ७ किलो खाद्यपदार्थ वापरासाठी अयोग्य आढळल्याने नष्ट करण्यात आले. एफडीएने विविध ठिकाणांहून मांसाचे पाच नमुने आणि इतर १३ खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले आहेत. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026