LIVE UPDATES

दुधात विष मिसळून अंगणवाडी सेविकेची दोन मुलांसह आत्महत्या

महिलेने आधी मुलांना विषारी पदार्थ मिसळलेले दूध पाजले नंतर ते दूध स्वतः पिले. त्यानंतर फार्महाऊसवरील पाण्याच्या टाकीत उडी मारली. या घटनेत महिला आणि तिची दोन्ही मुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती प्राप्त होते.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 17:31 PM
views 292  views

फरीदाबाद : एका महिलेने आपल्या दोन मुलांसोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. मेहुवाला गावात कौटुंबिक भांडणामुळे त्रस्त असलेल्या एका ३१ वर्षीय अंगणवाडी सेविकेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली. याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

दरम्यान, महिलेने आधी मुलांना विषारी पदार्थ मिसळलेले दूध पाजले नंतर ते दूध स्वतः पिले. त्यानंतर फार्महाऊसवरील पाण्याच्या टाकीत उडी मारली. या घटनेत महिला आणि तिची दोन्ही मुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती प्राप्त होते.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, गुरुवारी फार्महाऊसच्या आवारातील १० फूट खोल पाण्याच्या टाकीतून ३१ वर्षीय सुदेश, तिची ९ वर्षांची मुलगी ज्योती आणि ८ वर्षांचा मुलगा विनीत यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना समजताच शेजाऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

मृत महिलेचे नातेवाईक प्रवीण यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुदेशचा विवाह २०१४ मध्ये संदीप कुमारशी झाला होता. संदीपला मद्यपानाचे व्यसन होते आणि तो वारंवार आपल्या पत्नीला मारहाण करत असे, असा आरोप आहे. घटनेच्या अवघ्या एक दिवस आधीही या जोडप्यामध्ये एका मुद्द्यावरून वाद झाला होता. 

या दुर्दैवी घटनेनंतरच्या तपासादरम्यान, महिलेच्या फोनमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ सापडला. या व्हिडिओमध्ये महिला सुदेश आपल्या दोन निष्पाप मुलांना विषारी फवारणीचे औषध मिसळलेले दूध पाजताना दिसत आहे. त्यानंतर ती स्वतःही ते विष पीते. व्हिडिओमध्ये रडत असलेली सुदेश हे पाऊल उचलण्यासाठी पती संदीप कुमार याला जबाबदार धरतानाही दिसत आहे. मृत्यूच्या काही काळ आधी सुदेशने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक 'रील' देखील अपलोड केली होती.

महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दाखल केलेली तक्रार आणि सुदेशचा शेवटचा व्हिडिओ-जबाब या आधारे पोलिसांनी आता आरोपी पती संदीपविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026