LIVE UPDATES

'एफडी'च्या गुंतवणूकीवर 'या' बँका देत आहेत 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 17, 2026 12:32 PM
views 875  views

मुंबई : गुंतवणूकदारांसाठी एफडी हा आजही गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये एफडी करण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच बँका एफडीवर आकर्षक परतावा देत आहेत. सध्या काही बँका एफडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वोत्तम एफडी व्याजदर कोणत्या बँका देत आहेत, ते आपण जाणून घेऊया.

'या' बॅंका देत आहेत ८ टक्के व्याजदर 

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ वर्षांच्या एफडीवर ८.०५ टक्के व्याज देत आहे. जना स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ वर्षांच्या एफडीवर एयू स्मॉल फायनान्स बँक ७.२५ टक्के व्याजदर , इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ७.५० टक्के व्याजदर, शिवालिक स्मॉल फायनान्स बँक ६.७५ टक्के व्याजदर आणि स्लिक स्मॉल फायनान्स बँक ७.२५ टक्के व्याजदर देत आहेत. हे दर ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीसाठी लागू आहेत.

इतर बँका कोणते व्याजदर देत आहेत?

स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवर ७.०५ टक्क्यांपर्यंत व्याजदर जाहीर केले आहेत. एचडीएफसी बँक ४ वर्षे, ७ महिने आणि १ दिवस कालावधीच्या एफडीवर ६.९० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक ५ वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे.

पीएनबी ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.८५ टक्के व्याज देत आहे, तर ॲक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के व्याज देत आहे. जर मुदत ठेवीवर मिळणारे व्याज १ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर टीडीएस कापला जातो. दरम्यान, संबंधित व्यक्ती परताव्यासाठी पात्र असल्यास, इन्कम टॅक्स रिटर्न  भरून हा टीडीएस परत मिळवता येतो.

(डिस्क्लेमर - गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याआधी संबंधित बॅंकेत जाऊन एफडीच्या योजनेबाबत माहिती जाणून घ्यावी व त्यानंतरच गुंतवणूक करावी. दर्शवलेले व्याज आणि मॅच्युरीटी रक्कम केवळ अंदाजे किंवा माहितीसाठी आहे. प्रत्यक्ष दर बँक किंवा संस्थेच्या नियमांनुसार बदलू शकतात आणि यावर आयकर नियमांनुसार टीडीएस लागू शकतो.)


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026