LIVE UPDATES

Nepal Flood : नेपाळमध्ये पूराचा हाहाकार, शांत नदीने अचानक धारण केले रौद्र रूप

शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता : भोटेकोशी नदीला अचानक पूर
Edited by: Rajat Sawant
Published on: August 26, 2026 17:21 PM
views 337  views

नेपाळ : रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेले तर घर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तिबेटमधून नेपाळमध्ये वाहणाऱ्या 'भोटेकोशी' नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या भागातील बाजारपेठा आणि अनेक जलविद्युत प्रकल्प पाण्याखाली गेले असून त्यांचे नुकसान झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाने त्रिशूळ नदीच्या प्रवाहाच्या दिशेने खालील भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा दिला आहे.

'द काठमांडू पोस्ट'ने रसुवाचे मुख्य जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी नमूद केले की, "जिल्हा मुख्यालय किंवा आसपासच्या परिसरात कोणताही पाऊस झालेला नाही आणि हवामानही स्वच्छ आहे."

"नदीच्या वरच्या भागात एखादे हिमनदीचे सरोवर फुटल्यामुळे किंवा तात्पुरता बांध कोसळल्यामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. बाधित लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने म्हटले असून, प्राथमिक अहवालांनुसार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे".

पुराची दृश्ये निसर्गाचे रौद्र रूप दर्शवतात. अनेक घरे पाण्याखाली गेली असून अनेक घरांचे तळमजले जलमग्न झाले आहेत. नदीकाठच्या बाजारपेठा आणि अनेक जलविद्युत प्रकल्पही पाण्याखाली जाऊन त्यांचे नुकसान झाले आहे. त्रिशूळ नदीच्या परिसरातील भागात शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी नेपाळ लष्कराने दोन हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026