LIVE UPDATES

टीव्हीएस आयक्यूबचे 'हे' मॉडेल एकदा फूल चार्ज केल्यावर धावणार '११४ किमी'

TVS iQube Features and Specifications : आयक्यूबच्या बॅटरीची क्षमता केवळ 0.1 किलोवॅटने वाढली असली तरी रेंजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. नवीन आयक्यूबमध्ये पूर्वीसारखीच बीएलडीसी हब-माउंटेड मोटर कायम ठेवण्यात आली आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 27, 2026 13:10 PM
views 1121  views
TVS iQube 2.3 kWh electric scooter side view

नवी दिल्ली : टीव्हीएस कंपनीने भारतात आयक्यूब (iQube) चे नवीन 'एन्ट्री-लेव्हल' व्हेरिएंट लॉन्च केले आहे. यात आता जुन्या 2.2 किलोवॅट युनिटच्या जागी नवीन 2.3 किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. याची किंमत 1.16 लाख रुपये इतकी आहे. कंपनीच्या मते, नवीन मॉडेल फुल चार्जवर 114 किलोमीटरची आयडीसी रेंज देते. तर जुन्या 2.2 किलोवॅट मॉडेलची रेंज 94 किलोमीटर होती.

आयक्यूबच्या बॅटरीची क्षमता केवळ 0.1 किलोवॅटने वाढली असली तरी रेंजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. नवीन आयक्यूबमध्ये पूर्वीसारखीच बीएलडीसी हब-माउंटेड मोटर कायम ठेवण्यात आली आहे. ही मोटर 3.68 किलोवॅटची पीक पॉवर आणि 140 एनएम टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर अवघ्या 4.7 सेकंदात 0 ते 40 किमी/तास वेग गाठू शकते आणि तिचा टॉप स्पीड 68 किमी/तास आहे. (TVS iQube 2.3 kWh Range)

आयक्यूबमध्ये 10 अंशांची ग्रेडॅबिलिटी आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगची सुविधाही आहे. याची बॅटरी आयपी 67 रेटिंग असलेली लिथियम-आयन युनिट आहे. ती बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि स्पाइक प्रोटेक्शनने सुसज्ज असून त्यावर 50,000 किलोमीटरची वॉरंटी मिळते. पोर्टेबल ऑफ-बोर्ड चार्जर वापरून बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 2 तास 50 मिनिटे लागतात. कंपनीने ही स्कूटर पर्ल व्हाईट, वॉलनट ब्राउन आणि टायटॅनियम ग्रे अशा रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. 

नवीन टीव्हीएस आयक्यूबमध्ये दोन्ही चाकांवर 130 एमएमचे ड्रम ब्रेक्स आहेत. ही स्कूटर 12-इंच ट्यूबलेस टायर्सवर चालते. ट्युलर फ्रेम, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि हायड्रॉलिक ट्विन-ट्यूब रिअर शॉक ॲब्सॉर्बर्स देण्यात आले आहेत. 5 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आणि कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ब्लूटूथ आणि जीएसएम कनेक्टिव्हिटी तसेच ओटीए अपडेट्सची सुविधा मिळते.

या आयक्यूबध्ये जिओ-फेन्सिंग, अँटी-थेफ्ट (चोरी-विरोधी) अलर्ट्स, वाहनाचा लाईव्ह स्टेटस, अपघात आणि पडल्याचे अलर्ट्स, रिमोट कनेक्टिव्हिटी आणि अलेक्सा इंटिग्रेशन यांसारख्या ११८ हून अधिक 'कनेक्टेड' फर्चसचा समावेश आहे. नवीन आयक्यूबमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, पार्किंग ब्रेक आणि रिव्हर्स/फॉरवर्ड पार्किंग असिस्ट यांसारख्या सुविधांचाही समावेश आहे. (TVS iQube Performance)


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026