LIVE UPDATES

Kanpur aircraft crash : प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोघा वैमानिकांचा मृत्यू

Kanpur plane crash : कोसळलेले हे चार आसनी प्रशिक्षण विमान असल्याचे समजते. या अपघातात विमानात असलेल्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 27, 2026 15:19 PM
views 235  views

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील गंगा बैराज परिसरात प्रशिक्षणार्थी विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोसळलेले हे चार आसनी प्रशिक्षण विमान असल्याचे समजते. या अपघातात विमानात असलेल्या दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. वैमानिकाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान अचानक आकाशातून खाली आले आणि शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच स्फोटासारखा मोठा आवाज झाला. या अपघातामुळे आसपासच्या गावांमध्ये घबराट पसरली आणि मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमा झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आणि विमानामध्ये अडकलेल्या दोन्ही वैमानिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. विमान अपघाताची बातमी पसरताच घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. तांत्रिक बिघाड, हवामानाची स्थिती की अन्य काही कारणांमुळे हे विमान कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतरच समोर येईल.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026