LIVE UPDATES

Bank holidays in September 2026 : सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद, पहा सुट्ट्यांचे वेळापत्रक

देशातील नऊ प्रमुख बँकांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या संघटनेने ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 29, 2026 16:24 PM
views 1904  views
September 2026 bank holiday list showing 14 bank closure days

मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये विविध राज्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. यात चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारव्यतिरिक्त विविध ठिकाणी आणखी आठ दिवस बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्या जर तुमचे बॅंकेत काही तातडीचे काम असल्यास या सुट्ट्यांचे दिवस सोडून इतर दिवशी बॅंकेत जाऊ शकता.

बॅंकांचा चार दिवस संप 

देशातील नऊ प्रमुख बँकांच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' या संघटनेने ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. आठवड्यातून पाच दिवस काम ही बँक युनियन्सची एक प्रमुख मागणी आहे. तसेच २८ सप्टेंबरपासून म्हणजेच 28, 29, 30 सप्टेंबर असा तीन दिवसांचा संप आणि २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

सप्टेंबर महिन्यात एकूण ८ दिवस सुट्ट्या

संपामुळे बँकेचे कामकाज बंद राहाणार असून सप्टेंबरमध्ये ८ दिवस बॅंकांना सुट्ट्या आहेत. यामध्ये ६ सप्टेंबर, १२ सप्टेंबर, १३ सप्टेंबर, २० सप्टेंबर, २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर अशा ६ साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमीची सुट्टी असल्याने देशातील बहुतांश राज्यांमध्ये बँका बंद राहतील. तसेच, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी सणामुळे विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026