LIVE UPDATES

१० हजार mAh बॅटरी, 100W चार्जिंग अन् 50MP कॅमेरावाला रेडमीचा 'हा' फोन भारतात होणार लॉन्च

Redmi Note 17 Pro Max 5G India launch : भारतीय बाजारपेठेतील या फोनच्या लॉन्चची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रेडमी इंडिया या वेबसाईटवर या फोनचे लॅडिंग पेज तयार करण्यात आले आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 02, 2026 14:08 PM
views 139  views

नवी दिल्ली : शाओमीने भारतात रेडमी नोट 17 प्रो मॅक्स 5 जी ( Redmi Note 17 Pro Max 5G) स्मार्टफोन लॉन्च करण्याचे संकेत दिले आहेत. या फोनबाबत रेडमी इंडियाच्या सोशल मिडिया अकाऊंट्सवर माहिती देण्यात आली आहे. या फोनचे खास फिचर म्हणजे यामध्ये १०० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी १०,००० एमएएचची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेटसह ६.८३ इंचाचा १.५ के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

भारतीय बाजारपेठेतील या फोनच्या लॉन्चची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. रेडमी इंडिया या वेबसाईटवर या फोनचे लॅडिंग पेज तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, रेडमी नोट 17 प्रो मॅक्स 5 जी मध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा ६.८३ इंचाचा १.५ के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच १०,००० एमएएचची सिलिकॉन कार्बन बॅटरी आणि १०० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

लॅडिंग पेजवर दिलेल्या माहितीनुसार, नोट 17 प्रो मॅक्स 5 जी मध्ये ३,५०० निट्सपर्यंतचा पीक ब्राइटनेस आणि डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास विक्टस 2 देण्यात आले आहे. उत्तम परफॉर्मंससाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 5 चिपसेट देण्यात आला असून याला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी ते ५१२ जीबी पर्यंतचे स्टोरेज पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन ऍन्ड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर रन करणार असल्याने शाओमीच्या नवीन सॉफ्टवेअरचा अनुभव युजर्सना घेता येणार आहे. 

फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्ससाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये पाणी आणि धूळीपासून प्रोटेक्शनसाठी आयपी 66 आणि आयपी 68 रेटिंग्स देण्यात आले आहे. तसेच यात 5 जी, वाय फाय 6, ब्लूटूथ 6.0  आणि एनएफसी यांसारखी कनेक्टिव्हिटी फिचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. 

जपानमध्ये या जागतिक मॉडेलच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत सुमारे 47,900 रुपये इतकी आहे, तर 8GB+512GB मॉडेलची किंमत सुमारे 59,900 रुपयांच्या आसपास आहे. दरम्यान, भारतातील किंमत वेगळी असू शकते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026