LIVE UPDATES

nepal floods : 9 दिवस बोगद्यात अडकून करत होता 'हरे कृष्ण' मंत्राचा जप, योगोयोगाने 'कृष्ण जन्माष्टमी'च्या दिवशी सुटका

Nepal Tunnel Worker Rescued After 9 Days : सप्तरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजय साह (वय ३०) हे मधेश प्रांतातील 'नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी'चे कर्मचारी आहेत. बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या दोन कामगारांपैकी ते एक आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 04, 2026 18:51 PM
views 184  views
Nepal Tunnel Worker Rescued After 9 Days

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या महापुराचा तडाखा त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पाला बसला होता. या बोगद्यात अडकलेल्या दोघा कामगारांना नऊ दिवसानंतर बचाव पथकाने शुक्रवारी सुखरूप बाहेर काढले. या दरम्यान नेपाळ लष्कराच्या बचाव पथकाने 30 वर्षीय संजय साह यांच्यासोबतच ४५ वर्षीय कबीर महर्जन यांनाही जिवंत बाहेर काढले.

बचाव पथकाने सुखरुप बाहेर काढल्यानंतर संजय साह या मजुराने सांगितले की, मी त्या बोगद्यात जेव्हा अडकलो होतो तेव्हा सतत 'हरे कृष्ण महामंत्रा'चा जप करत होता. दरम्यान, योगोयोगाने त्यांची सुटका 'कृष्ण जन्माष्टमी'च्या दिवशीच झाली. 

सप्तरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजय साह (वय ३०) हे मधेश प्रांतातील 'नेपाळ इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी'चे कर्मचारी आहेत. बोगद्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या दोन कामगारांपैकी ते एक आहेत.

सुटकेनंतर साह यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगितले की, मी गेल्या नऊ दिवसांपासून 'हरे कृष्ण' महामंत्राचा जप करत होतो.". बचाव पथकातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साह यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणतीही आरोग्यविषयक समस्या नाही. त्यांना त्रिशूली येथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले.

सुटका करण्यात आलेल्या दुसऱ्या व्यक्तीला, कबीर महर्जन (वय ४५) यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरद्वारे काठमांडू येथील छाउनी स्थित नेपाळ आर्मी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026