LIVE UPDATES

iphone 18 pro : लॉन्चआधीच आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचे कलर आले समोर, पहा लीक व्हिडिओ

iPhone 18 Pro Colors Leak Ahead of Launch : ॲपलचा मोठा 'सरप्राईज अँड शाइन' इव्हेंट सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतात हा इव्हेंट रात्री १०:३० च्या सुमारास सुरू होईल. दरम्यान, लीक झालेल्या लूकमध्ये 'डार्क चेरी' आणि 'लाइट ब्लू' रंगांमधील मॉडेल्स दाखवण्यात आली आहेत.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 08, 2026 13:23 PM
views 368  views

नवी दिल्ली : ॲपलच्या नवीन 'आयफोन १८ प्रो' (iPhone 18 Pro) चा लॉन्च इव्हेंट ९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, फोन लॉन्च होण्याच्या आधीच याचे फिचर्स आणि लुक लीक झाला आहे. 'आयफोन १८ प्रो' आणि 'आयफोन १८ प्रो मॅक्स' च्या लाँचिंगपूर्वीच या फोनचे 'रिटेल डेमो युनिट्स' दाखवणारा एक नवीन व्हिडिओ लीक झाला आहे. दक्षिण कोरियातील एका ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने हा १४ सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

ॲपलचा मोठा 'सरप्राईज अँड शाइन' इव्हेंट सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतात हा इव्हेंट रात्री १०:३० च्या सुमारास सुरू होईल. दरम्यान, लीक झालेल्या लूकमध्ये 'डार्क चेरी' आणि 'लाइट ब्लू' रंगांमधील मॉडेल्स दाखवण्यात आली आहेत. व्हिडिओमध्ये आयफोन १८ प्रो मॅक्स 'डार्क चेरी' शेडमध्ये दिसत आहे, तर आयफोन १८ प्रो 'लाइट ब्लू' (फिकट निळ्या) रंगात दिसत आहे.

भारतात 'आयफोन १८ प्रो मॅक्स'ची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, मागील काही रिपोर्ट्सनुसार मागील मॉडेलच्या तुलनेत याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये ॲपलची नवीन 'ए20 प्रो' चिपसेट असण्याची शक्यता आहे. तसेच कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्लेमध्येही अपडेट होण्याची शक्यता आहे. 'आयफोन १८ प्रो मॅक्स'मध्ये ६.८६-इंचाचा एलटीपीओ डिस्प्ले आणि १२० हर्टझ रिफ्रेश रेट असू शकतो. यात 'सिरॅमिक शील्ड २' (Ceramic Shield 2) आणि अँटी-रिफ्लेक्टीव्ह कोटिंगचा समावेश करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.


Source and images: Laznuk (Naver)

एका रिपोर्टनुसार, 'आयफोन १८ प्रो' मॉडेल्सवरील मेन कॅमेरा मॉड्यूल मागील मॉडेलच्या तुलनेत सुमारे २ मिमी मोठे असू शकते. कॅमेरा सेन्सर्स आणि अंतिम डिझाइनबद्दलची संपूर्ण माहिती ॲपलच्या लाँचिंग कार्यक्रमादरम्यानच समोर येईल. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, चीनमध्ये याची सुरुवातीची किंमत सुमारे ११,००० CNY (अंदाजे १.५६ लाख रुपये) असू शकते. प्रत्यक्ष किंमत, स्टोरेजचे विविध प्रकार आणि भारतातील लाँचच्या वेळी असणारी किंमत याबाबतची माहिती कंपनीच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026