LIVE UPDATES

सदानंदशेठ तानावडे यांची राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड

राजन तेलींनी घेतली भेट
Edited by: संदीप देसाई
Published on: July 17, 2023 17:57 PM
views 814  views

सिंधुदुर्ग : गोवा राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ तानावडे यांची गोव्यातून राज्यसभा खासदारपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजन तेली व पदाधिकारी यांनी गोव्यात सदिच्छा भेट त्यांना शुभेच्छा दिल्या.  त्यावेळी  जिल्हाध्यक्ष तेली यांचेसंमवेत जिल्हाउपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत मळीक उपस्थित होते.

गोवा विधासभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर पुन्हा एकदा बिनविरोध राज्यसभा काबीज करत गोव्यात भाजपाचा वरचष्मा कायम असल्याचे स्पष्ट झालं आहे. गोव्यात व लगतच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे अगदी सलोख्याचे सबंध आहेत. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही ठिकाणचे राज्यांपासून ते जिल्ह्यापर्यंत भाजप नेते, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वच बाबतीत एकमेकांना सपोर्ट करत असतात. याच पार्श्वभूमीवर गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदांनदशेठ तानावडे यांची बिनविरोध राज्यसभा निवड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना बळ देणारी असल्याचे या भेटीत पदाधिकारी यांनी आवर्जून सांगत सिंधुदुर्ग भाजपा पार्टीकडून तेली व सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026