LIVE UPDATES

Chandrayan 3 : 'विक्रम लँडर' सायंकाळी चंद्रावर उतरणार

शेवटची 20 मि. महत्वाची
Edited by: ब्युरो
Published on: August 23, 2023 11:26 AM
views 825  views

ब्युरो : अखेर ज्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहात आहोत, तो चंद्रारोहण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे ‘चांद्रयान’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले यान भारताचे असणार आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.

14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून झेपावलेले चांद्रयान 40 दिवसांनी चंद्रावर उतरणार आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम लँडर चंद्रावर उतरणार असून, त्याच्या अर्धा तास आधी अंतिम टप्प्याला प्रारंभ होईल. बंगळूरच्या ‘इस्रो’च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून या सॉफ्ट लँडिंगची सारी सूत्रे हाताळली जाणार आहेत.

20 मिनिटांचा थरार असेल कसोटीचा

बुधवारी चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याआधीची शेवटची 20 मिनिटे इस्रोच्या वैज्ञानिकांसाठी आणि तमाम भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. टी-20 च्या सामन्याच्या उत्कंठावर्धक शेवटपेक्षाही थरारक असा हा टप्पा असणार आहे.

– विक्रम जेव्हा चंद्रापासून 25 कि.मी. अंतरावर असेल तेव्हा बंगळूरच्या कमांड सेंटरमधून सूचना मिळताच विक्रम लँडर खाली यायला सुरुवात येईल.

– त्यावेळी त्याचा वेग भयंकर म्हणजे 6048 किमी प्रतितास अर्थात 1.68 किमी प्रतिसेकंद एवढा असेल. हा वेग विमानाच्या वेगाच्या दहापट असेल.

– यानंतर विक्रम लँडरची इंजिन्स सुरू होतील. त्यामुळे ते त्याचा वेग कमी करून त्याला चंद्राला समांतर ठेवतील. ही प्रक्रिया तब्बल 11 मिनिटांची असेल.

– या प्रक्रियेदरम्यान विक्रम लँडर सुचनांनुसार हवेत बाजू बदलत आपले पाय चंद्राच्या पृष्ठभागाच्या 90 अंशात आणेल. म्हणजे त्यावेळी विक्रम लँडर उभे असेल.

– चंद्रापासून 800 मीटर उंचीवर यान आल्यावर त्याची गती शून्य होईल. ते हळूहळू 150 मीटर उंचीवर येउन स्थिरावेल.

– त्याच वेळी विक्रम लँडर खालच्या चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे घेत पृष्ठभागाचे विश्लेषण करून कमीत कमी धोक्याची आणि उतरण्यास सुयोग्य अशी जागा शोधेल.

– जागा निश्चित केल्यावर विक्रम लँडरची चारपैकी दोन इंजिन बंद होतील. आणि ते 3 मीटर प्रतिसेकंद या वेगाने खाली येईल व पायांवर ते चंद्रावर उतरेल.

– लँडरच्या सेन्सरने चंद्राचा पृष्ठभागाचा स्पर्श झाल्याचे कळवताच उरलेली दोन्ही इंजिनही बंद होतील.

लँडिंगचा क्षण लाईव्ह पाहण्याची संधी

चांद्रयानाचे लँडिंग पाहता येणार आहे. इस्रो बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी आपल्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपण करणार आहे. इस्रोचे यू ट्यूब चॅनल, इन्स्टाग्राम, एक्स खाते आणि फेसबुक पेजवरून ते सर्वांना पाहता येणार आहे. इस्रोच्या वेबसाईटवरही क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचे अपडेट कोकणसाद LIVEच्या सोशल मिडिया प्लटफॉर्मवर देखील पाहता येणार आहे. 



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Redmi Smartphone : 10,000 mAh बॅटरी अन् ५० मेगापिक्सल ओआयएस एआय कॅमेऱ्यासह रेडमीचे दोन स्मार्टफोन लॉन्च
September 16, 2026
OPPO Smartphone : 7000mAh बॅटरीसह भारतात लॉन्च होणार ओप्पोचा 'हा' बजेट फोन
September 11, 2026
Bank strike in India : राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप
September 11, 2026
new iphone launch 2026 : नव्या आयफोन 18 प्रो अन् प्रो मॅक्सचा लूक पाहिलात का? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
September 10, 2026